गोवा क्रीडा-अर्थमत

टीसीएसने दिली गोवा मणिपालला पोर्टेबल व्हेटीलेटर्सची भेट

पणजी :
टाटा कन्सल्टन्सी  सर्व्हिसेस (टिसीएस) या भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा प्रदाता आणि सल्लामसलत कंपनी कडून ट्रायोलॉजी ईव्ही ३०० पोर्टेबल व्हेंटिलेटर्स चे योगदान श्री मनीष त्रिवेदी, डॉ. आदित्य गोस्वामी,  श्री विनय शेट आणि श्री श्रीनिवास चिगलानी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

 

ही व्हेंटिलेटर्स नॉन इन्व्हेझिव्ह (एनआयव्ही) आणि इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेशन साठी उपयुक्त असून त्यांचा उपयोग रूग्णला  वॉर्ड्स मध्ये घेऊन जाण्यासाठी , तसेच व्हेंटिलेटर वरील रूग्णाला एका हॉस्पिटल मधून दुसर्‍या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी, तसेच स्टॅन्डअलोन आयसीयू मध्ये हलवण्यासाठी करणे शक्य आहे.

 

या योगदाना विषयी बोलतांना क्वालिटी ॲश्युरन्सचे प्रमुख आणि सिनियर मॅनेजर एचआर पांडूरंग साळगांवकर यांनी सांगितले “ पोर्टेबल व्हेंटिलेटर्स चे योगदान देण्याचा निर्णय आम्ही यासाठी घेतला कारण सध्याच्या साथीच्या काळात कोविड  मुळे  न्युमोनियाचे प्रमाण वाढले होते व रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असे.  कोविडची तिसरी लाट येण्याचा धोका पाहता ही  काळाची गरज बनली आहे.  आंम्हाला आनंद होत आहे की मणिपाल हॉस्पिटल कडून सातत्याने प्रयत्ने केले जात आहेत आणि राज्यभरातून येणार्‍या रूग्णांची काळजी घेतली जात आहे म्हणून आम्ही त्यांना सहकार्य केले आहे.”

 

आपले आभार व्यक्त  करतांना मणिपाल हॉस्पिटल्स गोवा चे हॉस्पिटल डायरेक्टर श्री मनीष त्रिवेदी यांनी सांगितले “  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने दिलेल्या योगदाना विषयी आम्ही त्यांचे अभारी आहोत.  आंम्हाला आनंद वाटतो की टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ने मणिपाल हॉस्पिटल ची निवड केली आहे.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: