सातारा 

जन्मगावी साकारणार शहीद तुकाराम ओबाळेंचे स्मारक

मेढा (प्रतिनिधी) :

जावली तालुक्यांतील केडाबे या जन्मगावी शहीद तुकाराम ओबळे यांच्या स्मारकाच्या जागेचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारने मार्गी लावला आहे. महसुल विभागाकडुन केडांबे येथील शहीद तुकाराम ओबळे यांच्या स्मारकाकरीता १ एकर जागा महसुल व वन विभागाकडुन जिल्हाअधिकारी सातारा याच्याकडे विषेश बाब म्हणुन हस्तांतरीत करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाविकास आघाडी सरकार कडुन घेण्यात आला आहे. मात्र केडाबे हे गाव ग्रामपंचायतीच क्षेत्रामध्ये येत असल्याने याला निधी देण्याचा अधिकार राज्याच्या ग्रामविकास खात्याकडे येत असल्यामुळे विधानपरीषद आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्याचे ग्रामविकास मत्री हसन मुश्रीफ यांची मत्रालयात भेट घेत जावली तालुक्यांच्या सुपुत्राचे भव्य स्मारक उभारणीकरीता ५ कोटी रुपायाच तरुतुद करावी अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मत्री हसन मुश्रीफ याच्याकडे केली आहे.

हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी एक महिन्यात जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश असतानाही या कामासाठी प्रशासनाने नऊ वर्षांहून अधिक काळ वेळ लावल्याने जावलीचा सुपुत्र शहीद तुकाराम ओबळे स्मारकाला वाट पहावी लागली.

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १६ जानेवारी २०१२ रोजी मंत्रालयात हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारक उभारणीबाबत बैठक घेण्यात आली. हुतात्मा ओंबळे यांचे जन्मगाव केडांबे येथे गावाजवळील एक हेक्टर जागेचे क्लिअर टायटल करुन जमीन जिल्हाधिकारी सातारा यांच्या नावे करण्याची कार्यवाही सातारा जिल्हाधिकाऱ्यांना एक महिन्यात करुन घेण्याचा आदेश सामान्य प्रशासनाच्या उपसचिवांनी दिले होते. केडांबेमधील गट नंबर १५९ क्षेत्र २ हेक्टर ६२.१ आर या भूखंडावर हुतात्मा ओंबळे स्मारक उभारण्याची निश्चिती जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतकडून निश्चित करण्यात आले.

केडांबे येथील गट नंबर १५९ चे क्षेत्र भैरवनाथ देवस्थान इमामवर्ग ३ चे असल्यामुळे शर्त शिथील करुनच हा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीचा होण्याकरीता तांत्रिक अडचण होती. केडांबे ग्रामपंचायतीने अट शिथील व मालकीहक्काबाबत सातबारावरील सहहिस्सेदार रघुनाथ ओंबळे, रामचंद्र पाडळे, लक्ष्मण ओंबळे, पांडुरंग ओंबळे, बाबुराव ओंबळे, हौसाबाई शेलार, सुभद्रा शेलार या सर्व शेतकऱ्यांनी विनामोबदला एक हेक्टर जागा स्मारकाकरीता देणारे समंतीपत्र २०१३ मध्येच देऊन सहकार्य केले. स्थानिक ग्रामपंचायतीने स्मारक उभारणीचा ठराव सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.

महसूल विभागाकडून जावळीचे तहसीलदार, सातारा प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय असा प्रवास होऊन देवस्थान वर्ग ३ गट नंबर १५९ या मिळकतीवरील शेरा कमी करुन जमीन कर आकारणी करण्याकरीत वेळकाढू कारभार केला असल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी स्मारक उभारणीकरीता जमीन उपल्ब्ध करुन देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाला एका महिन्याचा कालावधी दिला असतानाही प्रशासनाला विलंब लागला.

तब्बल ९ वर्षाहुन अधिक काळ महसुल विभागाकडुन देवस्थान इनाम वर्ग ३ जागेमुळे रेंगाळत पडलेला हुतात्मा तुकाराम ओबळे याच्या स्मारकांचे अखेर जमीनीवरील शेरा कमी करुन जमीन कर भरण्याबाबत जावलच्या केडांबे गावाचे सुपुत्र अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओबळे यांच्या स्मारकाकरीता १ एकर जागा महसुल व वन विभागाकडुन जिल्हाअधिकारी सातारा याच्याकडे विषेश बाब म्हणुन हस्तांतरीत करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार कडुन घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. लवकरच शहात तुकाराम ओबळे यांचे स्मारकाकरीता भरीव निधी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यामातुन निर्माण केला जाणार असल्याची माहीती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: