सातारा 

खासदार उदयनराजे आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात कमराबंद चर्चा…

सातारा (महेश पवार) :

भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात आज शासकीय विश्रामगृह येथे कमराबंद चर्चा झाली.

तब्बल अर्धा तासाहून अधिक दोघांच्यात ही चर्चा झाली.. मात्र या दोघांच्यात काय चर्चा झाली हे विचारले असता दोघांनीही सांगण्याचे टाळत आमचे 9 पिढ्यांचे संबंध आहेत.. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची बोलले जात आहे.. गेली कित्येक वर्षे अबोला धरून एकमेकांवर तिखट शब्दांचे बाण फेकणारे दोन्ही राजेंच्या भेटीने साताऱ्यातील राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: