देश-विदेश

”त्या’ मुलांसाठी केंद्र-राज्याने एकत्र यावे’

 मुंबई (अभयकुमार देशमुख) :
कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच याबाबत सकारात्मक विचार करावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.

कोरोनाच्या विषाणूंमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे.घरातील कमावत्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे.त्यांचे शिक्षण,आरोग्य इत्यादीची काळजी घेणे आवश्यक आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता असून केंद्रसरकारने व राज्यसरकारने परस्पर सामंजस्याने व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

मुलं देशाचे भविष्य असतात.त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारीदेखील आहे याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करुन दिली आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: