गोवा 

‘उत्तम कोटकर यांच्या निधनाने गरिबांचा कैवारी गेला’

पेडणे (प्रतिनिधी) :
उत्तम कोटकर यांनी पेडणेत ५० वर्षा पूर्वी दूरदृष्टी ठेऊन, गोरगरीबांची मूल शिकली पाहिजे ही विचारशरणी घेऊन शाळा सुरू केली, त्या शाळेचे आज वटवृक्ष झाले हजरांच्या संख्येने शेतकऱ्यांची मुले शिकली, समाजात नावलौकिक मिळवून आपल्या पेडणे तालुक्याचे नाव उज्वल करीत आहेत. शंभूराजे सारखे महानाट्य पेडणेत सादर करून संपूर्ण आशिया खंडात शैक्षणिक, सांस्कृतिक इतिहास घडविला. या महानाट्यत एकतरी कलाकार घडला तरी बस झाले म्हणणारा श्री भगवती हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष उत्तम कोटकर सर याना आज बारा दिवस पूर्ण होत आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे उदगार श्री भगवती हायस्कूलचे मुख्याध्यापक केशव पणशीकर यांनी पेडणे येथे उदगार काढले.

उत्तम कोटकर यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. त्या निमित्त श्री भगवती हायस्कूल मध्ये शाळेचे शिक्षक, पालक व हितचिंतक यांनी आयोजित केलेल्या शोकसभेत केशव पणशीकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष विनोद मेथर व माजी शिक्षक गोपाळ परब उपस्थित होते.

उत्तम कोटकर गेल्याने पितृदर्शक, मार्गदर्शक यांना पारखे झालो. गेली ५० वषे ही शिक्षणसंस्था मोठी केली. पुढे हीच संस्था आणखी ५० वर्षे अशीच सांभाळत गोरगरिबांची मुले शिकून मोठी झाली तर त्यांना खऱ्या अर्थाने या दिवशी आदरांजली वाहिली अस म्हणू शकतो, असे उदगार पणशीकर यांनी सांगितले.

भगवती शाळा म्हणजे उत्तम कोटकर यांचा जीव की प्राण होता, शाळे साठी यव्यक्तीने आपले संपूर्ण जीवन खर्चि घातले. शाळा चालवत असताना त्यांनी कुणावरच जोर जबरदस्ती केली नाही. ते संस्थेचे अध्यक्ष असून सुद्धा केव्हा शाळा स्वच्छ करण्यासाठी स्वतः पुढे असायचे यावरून त्या व्यक्तीला शाळेला काय महत्व समजायचे हे चित्र डोळ्यासमोर येत असे, असे गोपाळ परब यांनी सांगितले.

उत्तम कोटकर साहेब मराठीचे उपासक होते. पेडणेत मराठी रुजवावी, फुलावी यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम, योजना, मराठी संस्कार केंद्रा सारख्या चाळीस वर्ष्या अगोदर पेडणे स्थापना केली. मराठीचे संवर्धन करण्यासाठी आजही श्री भगवती हायस्कूल मध्ये मराठी मध्यम गेली पन्नास वर्षे शिक्षण दानाचे काम चालू ठेवले. आणा हजारे सारखे स्वतंत्र विचाराचे वेक्तिमत्व श्री कोटकर यांनी संस्कृती संवर्धनासाठी त्यानी सार्वजनिक गणेशोत्सव, सार्वजनिक दुर्गा उत्सव, साईबाबा मंदिर सारख्या संस्था पेडणेत येण्यासाठी प्रोत्साहन दिले व स्वतः मार्गदर्शन म्हणून काम केल्याच्या आठवणीना विनोद मेथर यांनी उजाळा दिला.


समाज घडविता, स्पस्ट वक्ता, स्वच्छ चरित्र, दुरविचारक उत्तम कोटकर साहेब यांना भावपूर्वक श्रद्धांजली, स्वतः पदरी कमी शिक्षण मात्र समाजाला शिक्षित करणारे कोटकर साहेब थोर होते, असे प्रदीप सावंत यांनी सांगितले.

उत्तम कोटकर यांनी उभारलेल्या श्री भगवती हायस्कूल मध्ये अनेक रक्तदान शिबिरे घडवून आणली मात्र उत्तम कोटकर याच्या शेवटच्या क्षणी त्यांनाच आपण रक्त देऊ शकलो नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पेडणेत पहिली भारत स्काऊट गाईट शाखा सुरू करणारे व शेवटच्या क्षणापर्यंत त्या शाखेचे अध्यक्ष राहिल्याचे चंद्रकांत सांगळे यांनी नमूद केले.

या वेळी गजानन कोरगावकर , अशोक तहसीलदार, अभय पेडणेकर, लीना वांझ, परशुराम गावडे, सुनील गावस न्हानू डेगवेकर यांनी आपले विचार मांडून आदरांजली वाहिली. संपूर्ण शोकसभेचे सूत्रसंचालन शिक्षक राघोबा उर्फ आशिष कांबळी यांनी केले. या वेळी मोट्या संख्येने शिक्षक, पालक व हितचिंतक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: