देश-विदेश

‘हिंदूंनी ५ ते ६ मुलांना जन्म द्यावा’

मथुरा :
उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये गाझियाबादमधील डासना मंदिराचे महंत नरसिंहानंद यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  महंत नरसिंहानंद यांनी गोवर्धन परिक्रमा मार्गावरील रमणरेती आश्रमातील एका कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. या ठिकाणी बोलताना महंत नरसिंहानंद यांनी मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचं वक्तव्य केलं. जिथे जिथे मुस्लिमांची लोकसंख्या वाढलीय तिथे ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. लोकांनी हिंदू नेत्यांवर भरोसा ठेऊन नये, असंही महंत नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे. प्रत्येक हिंदूने कमीत कमी पाच ते सहा मुलांना जन्म दिला पाहिजे. ज्या पद्धतीने मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे ते पाहता मोठं संकट येत आहे. प्रत्येक हिंदूने शस्त्रधारी होणं गरजेचं आहे, असंही महंत नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, करोना साथीसंदर्भात भाष्य करताना करोना हे सरकारचं षडयंत्र असल्याचा दावा नरसिंहानंद यांनी केलाय. मास्क लावून लोकांना आजारी पाडलं जात आहे. मी स्वत: मास्क लावत नाही आणि करोना असल्याचंही मानत नाही, असं नरसिंहानंद यांनी म्हटलं आहे. इतकचं नाही तर त्यांनी भारतामध्ये मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हिंदूंच्या नाशाचं कारण ठरु शकते, असंही म्हटलं आहे.

महंत नरसिंहानंद एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मथुरेत पोहचले होते. इथे त्यांनी अनेक संतांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना करोनाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. “मास्क लावून तुम्हाला आजारी पाडलं जात आहे. करोना हे सरकारचं खूप मोठं षडयंत्र आहे. मी स्वत: मास्कही लावत नाही आणि करोनालाही मानत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे ते लोक मास्क लावतात,” असं महंत नरसिंहानंद म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: