गोवा 

वास्को आयडीबीआय बँकेत आग 

मुरगाव (प्रतिनिधी) :

वास्कोतील आयडीबीआय बँकेत शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मात्र अग्निशमन दल व वीज कर्मचाऱ्यांनी वेळीच येऊन सदर आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली.
वास्को टुरिस्ट हॉटेल जवळ असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीएम कक्षातून धूर येत असल्याचा एका पादचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्याने सदर माहिती अग्निशमन दलाला दिली. लागलीच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
संध्याकाळच्या सत्रात कोरोना महामारीमुळे तसेच संचार बंदी असल्यामुळे अर्धा दिवस बँक बंद ठेवण्यात येत असल्याने बँकेतील कर्मचारी दुपारी बँक बंद करून घरी गेले होते. त्यामुळे शटर उघडण्यास वेळ लागला. त्या बँकेतील कर्मचाऱ्याला फोन करुन बोलावले असता तो हजर झाला व त्याने बँक उघडली. यावेळी आत मध्ये सर्वत्र धूर पसरला होता. वीज कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. तसेच पोलिसही घटनास्थळी हजर झाले. आत मध्ये धूर पसरल्याने काही वेळ नेमके आगीचे कारण समजले नाही. अग्निशमन दल व वीज कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहणी केली असता बँकेतील वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किट झाल्याने सदर आग लागल्याचे लक्षात आले. वीज कर्मचाऱ्यांनी आतील वीज कनेक्शन तोडून तो भाग मोकळा केला. तसेच अग्निशमन दलाने फायर हायड्रंटद्वारे फवारणी करून आगीवर नियंत्रण आणले. त्यामुळे मोठी हानी टळली.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: