गोवा 

बेळगावहून गोव्याला येणार भाजीपाला आजपासून बंद

पणजी:
कोविड संचारबंदीच्या काळात बेळगावाहून येणारा आणि गोवा फलोत्पादन विकास महामंडळाच्या दुकानांवर उपलब्ध होणारा भाजीपाला आता उपलब्ध होणार नाही. बेळगावातून गोव्यात भाजीपाला येणे बंद होणार आहे. बेळगावातील भाजी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तेथील व्‍यापाऱ्यांनी घेतल्यामुळे गोव्याला होणारा भाजीपाला पुरवठा खंडित होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेली सीपीएड मैदान व ऑटोनगर येथील आरटीओ मैदानावरील भाजी मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे एपीएमसी आवारात भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी द्यावी. जोपर्यंत एपीएमसीत पुन्हा भाजी मार्केट सुरू केले जात नाही, तोपर्यंत भाजी मार्केट बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. आज मंगळवारपासूनच याच्या अंमलबजावणीला सुरवात झाली.

एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन तेथील प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी भाजी मार्केट उभारले आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी आवश्‍यक त्या सुविधा नसल्याने व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसात गाळ्यांमध्येच पावसाचे पाणी तुंबले होते. भाजीपालाही पावसात भिजल्याने भाजी खराब झाली. याचा फटका शेतकऱ्यांसहीत व्यापाऱ्यांना बसला. वादळी वाऱ्यांमुळे एका शेडवरील पत्रा वाऱ्याने उडून गेला. या घटनेत व्यापारी थोडक्यात वाचला. अन्यथा, मोठी दुर्घटना झाली असती. सीपीएड मैदानातूनही उच्चभारीत विजेची केबल गेली आहे. ती केबलही व्यवसायिकांसाठी धोकादायक आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: