सिनेनामा

रणधीर कपूर रूग्णालयात दाखल

प्रकृती स्थिर; करोना चाचणी आली पॉझिटिव्ह

मुंबई :
अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ७४ वर्षीय रणधीर कपूर यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत कपूर कुटुंबीयांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
रणधीर कपूर यांची करोना चाचणीची पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण रणधीर यांना मधूमेह आणि काही आजार असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णलयाचे सीईओ डॉक्टर संतोष शेट्टी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘रणधीर कपूर यांना करोना झाल्यामुळे २८ एप्रिल रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे’ असे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी रणबीर कपूरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याने स्वत:ला घरीच क्वारंटाइन करुन घेतले होते. आजपर्यंत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाचा संसर्ग झाला. यामध्ये आलिया भट्ट, गोविंदा, कार्तिक आर्यन, विकी कौशल, कतरिना कैफ आणि इतरल काही कलाकारांचा समोवश आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: