Homeक्रीडा-अर्थमत

काय आहे नेमका ‘वी’चा ‘रेडएक्स फॅमिली पॅक’?

मुंबई :
टेलिकॉम ऑपरेटर वीने आपल्या प्रमुख रेडएक्स योजनेमध्ये रेडएक्स फॅमिली हा नवा प्लॅन सादर केला आहे. आज जास्तीत जास्त परिवार एकमेकांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अखंडित मोबाईल सुविधांवर अवलंबून आहेत, हे लक्षात घेऊन वी ने हा अनोखा पोस्टपेड अनुभव प्रस्तुत केला आहेवर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा, मनोरंजन आणि नातेवाईक व मित्रमंडळींसोबत भेटीगाठींसाठी कुटुंबातील अनेक सदस्यांचा डेटा वापर पूर्वीपेक्षा वाढला आहेकुटुंबातील सर्व सदस्यांच्या मोबाईल डेटाविषयक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी एकाच बिलामध्ये सर्व सदस्यांना अनलिमिटेड डेटा, मनोरंजन व प्रवास असे अनेक लाभ देणारा हा प्लॅन वी ने सुरु केला आहे.

१६९९ आणि २२९९ रुपये किंमत असलेल्या वी रेडएक्स फॅमिली प्लॅनमध्ये ग्राहकांना आपल्या कुटुंबातील अनुक्रमे ३ ते ५ सदस्यांना सामावून घेता येतेप्रत्येक कनेक्शनवर अनलिमिटेड ४जी डेटाबरोबरीनेच वी रेडएक्स फॅमिली प्लॅनमध्ये वी रेडएक्स प्लॅनचे लाभ देखील मिळतात ज्यामध्ये मनोरंजन, प्रवास आणि इतर अनेक लाभांचा समावेश आहे.

प्लॅनमधील प्राथमिक सदस्याला नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम आणि डिस्ने+ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या मेम्बरशिपबरोबरीनेच वी मुव्हीज अँड टीव्हीला व्हीआयपी ऍक्सेस देखील दिला जाईलया प्लॅनमध्ये २९९९ रुपयांचे ७ दिवसांसाठीचे इंटरनॅशनल रोमिंग पॅकेज सदिच्छापूर्वक दिले जाईलतसेच यूएस, युके, मध्यपूर्व आणि इतर अशा १४ देशांसाठी विशेष आयएसडी दरांचा लाभ देखील यामध्ये घेता येईल. याशिवाय प्राथमिक सदस्यांना वर्षभरात ४ वेळा फ्री लाउंज ऍक्सेस मिळेल, यामध्ये एक इंटरनॅशनल लाउंज आणि प्रीमियम कस्टमर सर्व्हिसला ऍक्सेस यांचा समावेश असेल.

वीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला यांनी सांगितले, “आमचा प्रमुख आणि एक्सक्लुसिव्ह रेडएक्स फॅमिली हा प्लॅन आमच्या वी परिवारासाठी सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहेहा प्लॅन अगदी सर्वार्थाने अनोखा आहे कारण यामध्ये आमच्या ग्राहकांना उत्कृष्ट मूल्य मिळेल आणि आमच्या पोस्टपेडचा प्रभाव व मजबुती अधिक जास्त वाढेलग्राहकांना त्यांनी या प्लॅनवर केलेल्या खर्चाचे पुरेपूर मूल्य मिळवून देणारा, अतिशय सुविधाजनक असा हा प्लॅन असून मूल्यवर्धित पोस्टपेड अनुभव मिळवून देतोआम्हाला पक्की खात्री आहे की, आजच्या काळात जास्तीत जास्त डिजिटल सेवांचा लाभ घेत असलेली अनेक कुटुंबे वी रेडएक्स फॅमिली प्लॅनला प्राधान्य देतील.” 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: