गोवा 

”त्यांच्या’ कुटुंबीयांना सामावरून घ्या सरकारी सेवेत’

विजय सरदेसाई यांचे राज्य सरकारला आवाहन

पणजी :
राज्यात अनेक कोविड योध्दे आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा देत आहेत. जीव वाचवत आहेत. त्यामुळे या काळात ज्या कोविड योध्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटूंबियातील एकाला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी गोवा फाॅरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना दिलेल्या पत्रात ते म्हणतात की, कोरोना व्हायरसच्या अतिशय जीवघेण्या अशा वातावरणात कोविड योध्दे अहोरात्र कार्यरत असतात. आमच्या गोयकारांचे प्राण वाचवण्यासाठी ते आपले प्राण धोक्यात घालतात. त्यांच्या कुटूंबातले ते अत्यंत प्रिय व्यक्ती असतात. त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह पुर्णपणे त्यांच्यावरच अवलंबुन असतो. त्यामुळं त्यांच्या कुटूंबासाठी ते खुप महत्वाचे असतात.

आम्हा गोयकारांचे प्राण वाचवण्यासाठी आज सर्व कोविड योध्दे अहोरात्र संघर्ष करत आहेत. त्यांना न्याय देणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्यामुळं आज आमचे राज्य सुरक्षित आहे. त्यांचे बलिदान आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यामुळं ज्या कोविड योध्यांनी आपलं बलिदान दिलं, त्या कोविड योध्यांच्या कुटुंबियाला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: