गोवा 

व्हर्च्युअल पद्धतीने होणार घटकराज्याचे कार्यक्रम

पणजी :
उद्या 30 मे रोजी गोवा घटक राज्य दिवस आहे. त्यादिवशी आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने कोणते कार्यक्रम करता येतील, याविषयी सर्व मंत्र्यांकडून मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सूचना मागवल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सचिवांची बैठक मंत्रालयात घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. तर 12 वीच्या परीक्षेबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

घटक राज्य दिनाच्या निमित्ताने कोविड प्रतिबंधात्मक अशी कोणती तरी योजना सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सचिवांसोबत चर्चा केली. विविध खात्यांत कोणते उपक्रम सुरू आहेत. कोणते उपक्रम 30 मे रोजी नव्याने सुरू करता येतील वा एखादा नवा उपक्रम सुरू करता येईल काय ? याची चाचपणीही मुख्यमंत्र्यांनी सचिवांसोबत घेतलेल्या या बैठकीत केली. त्यांनी विविध खात्यांकडून कोविडकाळात राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचाही आढावाही घेतला.

या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की यंदा कोविडचा प्रादूर्भाव असल्याने घटक राज्य दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नाही. त्यामुळे आभासी पद्धतीने, पण चांगल्या रीतीने हा दिवस साजरा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याविषयी पूर्वतयारीसाठी सचिवांची बैठक घेतली. विविध खात्यांकडून आलेल्या सूचनांचा आढावा घेतला आहे. सहकारी मंत्र्यांकडूनही घटक राज्य दिन साजरा करण्याविषयी कल्पना मागवल्या आहेत. त्याविषयी सरकार निर्णय घेईल. ते म्हणाले, आभासी पद्धतीने घटक राज्य दिन साजरा करावा लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोविड महामारी प्रतिबंधक, असा कोणता उपक्रम त्या दिवशी सुरू करता येईल का? याचाही विचार सुरू आहे. दरम्यान 12 वीच्या परीक्षांबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: