सातारा 

शिवसेनेच्या प्रयत्नांना यश ; जावलीत नळ पाणीपुरवठा योजनांना निधी मंजूर

जावली (प्रतीनिधी) :

जावली तालुक्यांतील पर्जन्यमान असुन देखील जावलीतील गांजे , आबेघर तर्फ मेढा , कुसुबी , उबरेवाडी , मुकवली गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती नसल्यामुळे जटील झाला होता .जावलीचे शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मत्री गुलाबराव पाटील .याच्याकडे पाठपुरावा करत १५ लाख रुपायचा निधी गांजे , कुसुबी , आबेघर , उबरेवाडी , मुकवली गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती करीता मंजुर केला असल्याची माहीती शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी दिली .

जावलीतील निधी गांजे , कुसुबी , आबेघर , उबरेवाडी , मुकवली यागावच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना दुरुस्तीला निधी नसल्यामुळे मरणसन्न अवस्थेत गेल्या होत्या.जावलीत पर्जन्यमान मुबलक असुन देखील जावलीतील कडेकपारीतील माताभगिनीच्या डोक्यावरील हंडा दररोजचा नित्यनियम होवुन बसला आहे . जावलीच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचा निधी मार्गी लावण्याकरीता शिवसेना नेते एकनाथ ओबळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन प्रयत्न केले असल्याने १५ लाख निधी राज्याचे ग्रामीण पाणी पुरवठा मत्री गुलाबराव पाटील यांनी निधीकरीता हिरवा कंदील दाखवत १५ लाख रुपायाचा निधी उपलब्ध केला आहे.


जावली तालुक्यांतील आबेघर तर्फ मेढा ३.३९ लाख , उंबरेवाडी २.८४ लाख, कुसुबी १.३० लाख , गांजे २.८९ लाख , मुकवली ४.५२ लाख रुपायाच निधी मंजुर झाला आहे . जावलीचे शिवसेना नेत एकनाथ ओबळे यांनी निधी आणण्याकरीता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन प्रयत्न केले .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: