सातारा 

नामदेव पाटील यांच्यामुळे खासदारांच्या घरात शिरले पाणी?

कराड (अभयकुमार देशमुख) :
स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक बिल्डर नामदेव पाटील यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे परिसरात असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी पावसाचे पाणी शिरल्याचे बोलले जात आहे. परिसरातील नामदेव पाटील यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आले आणि त्यामुळेच खासदारांच्या निवासस्थानामध्ये पाणी शिरल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

दरम्यान तहसीलदार अमरदीप वाकडे अप्रत्यक्षरित्या हे नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आल्याचे मान्य करत सदर प्रवाह पूर्ववत करण्या संदर्भात सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

तहसीलदार वाकडे यांनी सांगितले कि, परवा अचानक मोठा पाऊस पडला होता. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. आणि हा प्रवाह खा. पाटील यांच्या निवासस्थानात शिरला. यात निवासस्थानांचे नुकसान जास्त प्रमाणात झालेले नाही. अतिक्रमणांची आम्ही पाहणी केली असून तलाठी आणि सर्कल यांना प्रवाह नैसर्गिक करण्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. बांधकाम मोठे असून सदरच्या बांधकाम व्यावसायिकाने परवागी घेतली असेल असे वाटते. मात्र तरीही त्याची सर्व माहिती घेउन योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच व्यावसायिकाने अतिक्रमण केले असल्यास ते काढून घेतले जाईल.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: