गोवा 

‘मिशन फॉर लोकल’तर्फे ८०० हून अधिक लोकांना पाणी पुरवठा

पेडणे :
कोरगाव येथील मिशन फॉर लोकल या संस्थेने सामाजिक कार्यकर्ते  राजन बाबुसो कोरगावकर यांनी कोरोना महामारीच्या काळात तहानलेल्या जनतेला पाणी पुरवठा करण्याची योजना आखली आणि अल्पकाळात आतापर्यंत ८०० हून अधिक तेंकर द्वारे पाणी पुरवठा केला . याविषयी संस्थेचे राजन कोरगावकर यांनी माहिती देताना दिनांक ११ एप्रिल २०२१ पासून मिशन फॉर लोकल पेडणेतर्फे संपूर्ण पेडणे मतदार संघात पिण्याच्या पाण्याची सोय समस्त पेडणे वासियांना करून देण्यात येत आहे , तिथ कुठलाच मतभेद नाही, ज्याची मागणी त्याला पुरवठा अशे धोरण राबवण्यात येत आहे.

आतापर्यंत जवळपास संपूर्ण कोरगाव पंचायत क्षेत्रात अनेक लोकांना पाण्याची सोय करून दिलेली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ७.३० वाजेपर्यंत सतत मिशन फॉर लोकलचा पाण्याचा टँकर सगळीकडे फिरून गावा-गावात पाणी पुरवत असतो. संपूर्ण दिवसाला जवळपास १५ ते १८ टँकरद्वारे लोकांना पाणी पुरवण्याचे काम मिशन फॉर लोकलतर्फे होत आहे.

चक्रीवादळ झाल्यानंतर पेडणे तालुक्यात पाण्याची कमतरता खूपच भासू लागली. यावेळी मिशन फॉर लोकलतर्फे पेडणे भागात अजून एक नवीन टॅंकरद्वारे लोकांना पाणी देण्यात आले. त्यावेळी मात्र मिशन फॉर लोकलतर्फे सकाळी ७.३० ते रात्री उशिरा १०.३० पर्यंत पाण्याचा टँकर सगळीकडे फिरून गावा-गावात पाणी पुरवठा होता. असे करून संपूर्ण दिवसाला जवळपास ३५ ते ४० टँकरद्वारे लोकांना पाणी पुरवण्याचे काम मिशन फॉर लोकलतर्फे होत आहे. अलीकडेच निगळे, पेडणे येथील ओहळावरील पूल कोसळल्याने लोकांना पाणी मिळत नसल्याने लोकांना त्वरित पाणी मिळावे म्हणून वारखंड द्वारे जाऊन टॅंकरने तेथील लोकांना पाणी देण्यात आले. आतापर्यंत जवळपास ८०० हून अधिक टँकरद्वारे लोकांना पाणी देण्यात आले आहे.

जल योजनेविषयी माहिती देताना मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी सांगितले , सध्या  पाण्याची समस्या आहे , हि समस्या शासनाने लोकप्रतिनिधीने सोडवायला हवी होती , मात्र ती सोडायला हे प्रशासन अपयशी ठरले आहे , सरकारला लेखी निवेदने , अधिकाऱ्यांना घेराव घालूनही जनता विटलेली आहे. राजन कोरगावकर यांनी बोलताना पाणी म्हणजे जीवन ते चोवीस तास जनतेला मिळायला हवे . मात्र आजपर्यंत लोकप्रनिधिनी पाण्याची समस्या  सोडवली नाही , आता यापुढे भुमिपुत्राना संघटीत होवून हि समस्या सोडवायला हवे असे सांगितले.

goaसामाजिक बांधिलकी ओळखून आम्ही मतदार संघात सर्वांपर्यंत  पोचणार आहोत , सर्वांच्या सहकार्यानेच हि जल योजना , धारगळ , मोपा, पत्रादेवी पेडणे व कोरगाव या भागात घरोघरी पोचवणार असल्याचे सांगितले . सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे , ज्याना पाण्याची  गरज आणे त्यांनी मिशन फॉर लोकल कार्यालयात संपर्क  किंवा कार्यकर्त्ये राजू व इतरांकडे संपर्क साधावा असे आवाहन केले. पाण्याच्या माध्यमातून अगोदर आम्ही लोकापर्यंत पोचुया व नंतर पाणी पुरवठा का होत नाही त्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेवून त्याचा पाठपुरावा करुया परंतु तोपर्यंत मिशन फॉर लोकल तर्फे घराघरात पाणी पुरवठा करुया असे राजन कोरगावकर यांनी सांगितले .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: