गोवा 

‘कुडाळकर व कार्दोज कुटुंबियांना करणार सर्वतोपरी मदत’

पेडणे :
मोरजी पंचायत क्षेत्रातील ध्रुव कुडाळकर ,डॉमनिक कार्दोज व इनास कार्दोज यांच्या घरावर आंब्याचे व नारळाची झाडे पडून किमान वीस लाख रुपयांची नुकसानी नुकत्याच चक्रीवादळाने झाली. कुडाळकर कुटुंबियांचे तर पूर्ण घर धोकादायक स्थितीत असून मोठे आंब्याचे झाड त्यांच्या घरावर कोसळून पूर्ण छप्पर गेले आणि भिंती कोसळल्या. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी त्यांचे किमान १२ लाख रुपये नुकसान झाले. तर कार्दोज कुटुंबियांचे ८ लाख नुकसान झाले. या दोन्ही कुटुंबाना भेट देऊन त्यांना आपण सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही युवा काँग्रेस नेते सचिन परब यांनी आज दिली.

झाड कोसळण्याच्या घटनेला १५ दिवस या घटनेला झाले सरकारी यंत्रणा त्यांच्या मदतीला आली नाही. जे झाड कोसळले होते ते आठ दिवसानंतर क्रेनच्या साहाय्याने काढले. मात्र कुडाळकर याना आसराच उरला नव्हता, अशा परिस्थितीत धोकादायक घरात कुटुंब वास्तव करून राहत होती. सरकारकडून मदतीची गरजेसाठी याचना केली जायची पण मदतीचे हात पुढे आले नाहीत.

मात्र जे सरपंच, आमदार, मंत्री नाही ते सामाजिक कार्यकर्ते मात्र कुडाळकर कुटुंबियांच्या मदतीला धावून आले. आठ दिवसापूर्वी घरावरील झाडाचे अडथळे हटवले. मात्र छप्पर घालून कोण देणार , आसरा कोण देणार या विवंचनेत कुडाळकर मंडळी होती. या सगळ्या बाबी  मांद्रे कॉंग्रेसचे युवा नेते सचिन गोपाळ परब याना कळताच ते दोन्ही कुटुंबाच्या मदतीसाठी धावून गेले. दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. गरजूंना मदत करणे हीच खरी माणुसकी असल्याचे सांगत यावेळी परब यांनी दोन्ही कुटुंबाना आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली. आणि  आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोचली नसल्याची नाराजीही  व्यक्त केली.

sachin parab

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: