नेहमी 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'नं प्रमाणित केलेलं सर्टिफाइड सोनंचं खरेदी करा. याद्वारे सोन्याची गुणवत्ता कळते. यासह, तुम्हाला ते सोनं नंतर विकण्यात किंवा देवाणघेवाण करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
सोनं खरेदी करण्यापूर्वी आधी बजेट ठरवा. तुमच्या आर्थिक परिस्थितीचं मूल्यांकन करा आणि आर्थिक उद्दिष्टांशी तडजोड न करता तुम्ही सोन्यावर किती खर्च करू शकता ते ठरवा. त्यानंतरच सोनं खरेदी करा.
सोनं खरेदीसोबत तुम्हाला मेकिंग चार्ज देखील भरावा लागतो. अनेकदा ज्वेलर्स मेकिंग चार्जेस बदलत राहतात. अशा परिस्थितीत, मेकिंग चार्जेसबद्दल ज्वेलरकडून नक्की माहिती घ्या.