देश-विदेश

मोदींनी स्वीकारला बंगालचा पराभव 

नवी दिल्ली :
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये साऱ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागूले होते. कारण पश्चिम बंगालची  (bengal election) निवडणूक भाजपा आणि तृणमूल काँग्रेसनं प्रतिष्ठेची केली होती. ममता दीदींना पराभूत करण्यासाठी भाजपाने पश्चिम बंगालमध्ये शड्डू ठोकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र ममता दीदी संपूर्ण भाजपाला उरून पुरल्या. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवत तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजपानंही पश्चिम बंगालमधील पराभव स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.
‘पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचं अभिनंदन, केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहील. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि करोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
‘पश्चिम बंगालमधील जनतेचा मी आभारी आहे. त्यांनी आमच्या पक्षाला आशीर्वाद दिला. भाजपाच्या जागा निश्चित वाढल्या आहेत. भाजपा जनतेची सेवा करत राहील. निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मी कार्यकत्यांचे आभार मानतो’, असंही ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!