गोवा 

‘ऑक्सिजन तुटवड्यावर सरकार काय करते आहे?’

आम आदमी पक्षाने केला मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

पणजी : 
देशभरात ससुरु असलेल्या ऑक्सिजन (oxygen) तुटवड्याचा परिणाम गोव्यावर देखील झाला असून, जी.एम.सी. येथे ऑक्सिजनसाठी विनंती करणारे अनेक संदेश सोशल मीडियावर लोक प्रसारित करताना दिसत असून, राज्य सरकार त्यासाठी काय करते आहे? असा प्रश्न आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी विचारला आहे.
 आपल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, “गोव्यातील कोविड चाचणी बाधित होण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याने सावंत सरकारने ऑक्सिजनशी संबंधित जनतेची दिशाभूल करण्याऐवजी ऑक्सिजनच्या समस्येवर सरकारकडे काय तोडगा व योजना आहे, ते स्पष्ट करावे. मुख्यमंत्री सावंत यांच्यात आता आत्मविश्वास राहिलेला नाही कारण त्यांच्या आरोग्यमंत्र्यांनीच ऑक्सिजन घोटाळ्यात हात धुतलेले आहे. केंद्र सरकार आणि शेजारच्या राज्यांशी चर्चा करून गोव्याच्या ऑक्सिजनपुरवठय़ासाठी सावंत सरकार कशाप्रकारे योजना आखत आहेत, हे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट व पारदर्शकपणे जनतेसमोर मांडले पाहिजे.”
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: