सातारा 

अंगापूर कोविड सेंटरचा मुहूर्त नक्की कधी?

घोषणा होऊन दिड महिना झाला तरी परिस्थिती जैसे थे

सातारा (महेश पवार) :
कोरोनाने जिल्ह्याला विळखा घातला असून तो आधिकच घट्ट होत आहे.राज्याच्या तुलनेत सातारा जिल्हा रेडझोन मध्ये आहे.त्यातच म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे.अशा परस्थितीत अनेकांना आँक्शिजन बेड उपलब्ध होत नसल्याने अंगापूर वंदन येथिल कोविड सेंटरची घोषणा करण्यात आली होती. मात्र गेली दिड महिना झाले तरी या सेंटरचे घोंगडे भिजतच असून हे सेंटर सुरू करण्याचा नक्की मुहूर्त कधी असा उद्दीग्न सवाल परीसरातील नागरीक उपस्थित करीत आहेत. यावर तात्काळ कार्यवाही करून हे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी परीसरातून होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील वडूथ,पुसेगाव, क्षेत्रमाहुली,आणि अंगापूर वंदन या ठिकाणी कोविड सेंटर उभारणीस १६ एप्रिल रोजी झालेल्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या सेंटरसाठी आवश्यक साहित्य व सुविधा तात्काळ तयार केल्या जातील अशी माहिती आ.शशिकांत शिंदे यांनी दिली होती.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी विनय गौडा यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.तसेच या कोविड सेंटरसाठी १०लाख रूपये आमदार निधीतून दिले आहेत. त्याच बरोबर अतिरिक्त ५०लाख रूपये निधी मंजूर व्हावा यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचेकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतले आहेत.

येत्या सात दिवसात प्रत्येकी ३० बेंडसचे कोविड सेंटर सुरू करण्यात येईल. सातारा जम्बो कोविड हाँस्पिटल प्रमाणे येथेही सर्व सुविधा उपलब्ध होतील .अशी ही घोषणा करण्यात आली होती. त्याप्रमाणे पुसेगाव, वडूथ ,क्षेत्रमाहुली येथिल कोविड सेंटर सुरू सुध्दा झाली. मात्र गेली दिड महिना झाला तरी अंगापूर वंदन येथिल नव्याने बांधन्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरचे घोंगडे भिजतच पडले असून या कोविड सेंटरचा मुहूर्त नक्की कधी असा प्रश्न परीसरात नागरीक उपस्थित करीत आहेत.हे कोविड सेंटर सुरू झाले तर परीसरातील नागरीकांसाठी हे सेंटर संजीवनी ठरणार आहे. यासाठी ते तात्काळ सुरू करावे अशी मागणी होत आहे.

दिड वर्षात या आजाराने अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.ऑक्सिजनयुक्त मोफत कोविड सेंटर सुरू झाले तर  परीसरातील बाधितांना उपचारासाठी कोठेच वणवण भटकावे लागणार नाही. भविष्यातील धोके टळून  परीसरातील नागरीकासाठी हे कोविड सेंटर संजीवनी ठरणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: