देश-विदेशगोवा 

‘इव्हर्मेक्टिनचा’ वापर न करण्याचा WHOचा सल्ला

नवी दिल्ली :
जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी इव्हर्मेक्टिन (ivermectin) या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट करत हे औषध न वापरण्याचा इशारा दिला आहे.
गोव्यात सोमवारी १८ वर्षावरील सर्वांना हे औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ही माहिती दिली आहे.“नवीन लक्षणांसाठी कोणतेही औषध वापरण्याआधी त्याची सुरक्षितता आणि क्षमता जाणून घेणे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही चाचण्याशिवाय कोविड -१९च्या उपचारासाठी इव्हर्मेक्टिन वापरण्यास परवानगी देत नाही” असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ivermectinडॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी जर्मनीच्या हेल्थकेअर आणि लाईफ सायन्सेस कंपनी मर्कचे एक जुने विधान ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये “वैज्ञानिक कोविड १९ च्या उपचारासाठी इव्हर्मेक्टिनच्या (ivermectin) क्षमता तपासण्यासाठी अभ्यास करत आहे. आतापर्यंत करोनाच्या उपचारासाठी हे उपयोगी ठरेल असे कोणतेही प्रमाण मिळाले नाही”, असे म्हटले होते.
गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा जागतिक आरोग्य संघटनेने इव्हर्मेक्टिनचा वापर टाळण्याची सूचना केली आहे. याआधी मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने इव्हर्मेक्टिनचा अतिशय कमी प्रभावी असल्याचा दावा केला होता.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: