गोवा 

‘…सरकारने किमान गुन्हेगारांची पाठराखण तरी करू नये’

पणजी:
वेर्ला काणका, बार्देज येथील उद्योजक रॉय फर्नांडिस आणि त्याचे कर्मचारी अग्नी अहमद आणि इमॅन्युएल डिसोझा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यांनी निषेध केला आहे.

वेर्ला येथील कोमुनिदाद जमिनीवर चालू असलेल्या बेकायदेशीर कामा संदर्भात रॉय फर्नांडिस यांनी तक्रार नोंद केली होती आणि डोंगर कापणी बंद केली होती. सरकार जर आमच्या नागरिकांना सुरक्षा देवू शकत नाही, तर किमान गुन्हेगारांची पाठराखण करु नये.” असे म्हार्दोळकर म्हणाले.

“जो व्यक्ती आमचे डोंगर आणि पर्यावरणाचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याच्यावरच हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि गुन्हा केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहोत. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.

रॉय फर्नांडीस यांच्यावर पाच जणांनी हल्ला केला होता. त्यात फर्नांडिस आणि त्यांचे कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.

म्हार्दोळकर म्हणाले की फर्नांडिस विविध मंचांवर सार्वजनिक प्रश्न उपस्थित करीत असतात.

“जो व्यक्ती हा डोंगर कापत होता, त्याला फर्नांडिसच्या तक्रारी नंतर काम बंद करावे लागले. म्हणून सूड घेण्यासाठी हा हल्ला केला गेला आहे. गृह खात्याने  हा मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे आणि जे आमच्या  पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचे संरक्षण केले पाहिजे. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.

गोव्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे हे या घटनेने सिद्ध झाले आहे आणि म्हणूनच अशा  बेकायदेशीर कारवायांना विरोध करणाऱ्याना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप म्हार्दोळकर यांनी केला.

“जे बेकायदेशीर कृत्य करतात त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. म्हणूनच ते लोकांवर हल्ला करण्याचे धाडस करतात. हे घडत आहे कारण गोवा सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही. ” असे म्हार्दोळकर म्हणाले.

म्हर्दोळकर म्हणाले की, या असंवेदनशील भाजपा सरकारने पर्यावरणाचा नाश करून गोव्यात तीन प्रकल्पांना परवानगी दिली आणि हजारो झाडे तोडून टाकली, यामुळे या सरकारपासून चांगल्याची अपेक्षा करता येणार नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: