मुंबई 

समाजस्वास्थासाठी सरसावली लोढा-पलावातील तरुणाई 

  • प्रतिनिधी 

लोढा हेवन, पलावा शहरातील सर्व धर्मीय समाजातील तरुण नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.मागील वर्षी पासून या शहरात कोरोनाचा पादुर्भाव असताना काही तरुणांनी मिळून नागरी हितासाठी आपली प्रामाणिक निस्वार्थी सेवा बजावली आहे कठीण परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी हे तरुण आजही सज्ज असून दिवस रात्र नागरी हितासाठी झटत आहेत. परिसरात कोव्हिड १९ च्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देण्यासाठी हे तरुण प्रयत्नशील राहिले आहेत. डोंबिवली, कल्याण, ठाणे, मुंबई इत्यादी ठिकाणी या तरुणांच्या माध्यमातून अनेकदा नागरिकांना वैद्यकीय मदतीने दिलासा मिळाला आहे.

धर्म,पंथ जात,पात,न पाहता सामाजिक बांधीलकीतुन नागरी सेवा आणि नागरी हित जोपासून सामाजिक,शैक्षणिक,आर्थिकदृष्ट्या विभागातील आजचा नवतरुण पुढे येणे आवश्यक आहे…असा हा तरुण गट आपल्या कार्याप्रति परिसरात स्वतःला सिद्ध करीत आहे…नागरिकांच्या मदतीसाठी हे काही तरुण मिळून सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांना आणि लोकप्रतिनिधीच्या भेटीगाठी घेत आहेत…केवळ नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी…

विभागातील नागरी समस्या आणि निवारण होण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांना पत्रव्यवहार करून जागे करण्याचे काम हे नवतरुण करीत आहे.शिवाय मागील लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत नोकरी,धंदा हातचा गेल्याने  हताश असलेला नागरिक दोन वेळच्या अन्नाची तजवीज करीत आहे.अश्या परिस्थितीत मुलांच्या ऑनलाईन सुरू असणाऱ्या शाळेच्या फिज अव्वाच्या सव्वा असल्याने त्या कश्या काय भराव्यात ? अश्या मनस्थितीत आज नागरिक,पालक वर्ग खितपत पडला आहे.अश्या नागरिकांना दिलासा मिळावा या करिता महाराष्ट्र राज्याच्या शिक्षा मंत्री याना या तरुणांचनी पत्रव्यवहार करून शालेय संस्थाची थकलेली फिज माफ करण्यात यावी किंवा ती किमान ५०% तरी माफ व्हावी अशी प्रमुख मागणीही केली आहे.

विभागात अश्या अनेक समस्या भेडसावत असताना हे तरूण सध्याची परिस्थिती व कोव्हिडं १९ चा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने या विषयावर महत्त्वाचे लक्ष केंद्रित करून परिसरातील कोरोना बाधित नागरिकांना ऑक्सिजन बेड,आयसीयू बेड,व्हेंटिलेटर बेड व अन्य वैद्यकीय सेवा देणासाठी पुढे सरासावला आहे.व्यक्ती कोणताही असो,माणूस म्हणून माणुसकी च्या नात्याने विभागातील नवतरुण आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी पुढे येत आहेत शिवाय या तरुणांना कोणत्याही प्रकारचा राजकीय वरदहस्त नसताना आपले नागरी हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी हा तरुण आता अग्रेसर होत आहे.

सध्या कोरोनाचा नवा कहर तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन विभागात नवंनवे विषय जनजागृती साठी साकारत असताना झूम मिटींग तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन नागरी सहभागातून विभागात हे तरुण साकारत आहेत.पुढील संभाव्य कठीण व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे नवतरुण सातत्याने पुढे असणार आहेत.माझे कुटुंब माझी जवाबदारी याच संकल्पनेतून या तरुणांचा २०२१ चा संकल्प आणि निर्धार आहे,लोकांच्या मनातील कोरोनाची भीती नष्ट होण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबूवन नवा आदर्श नक्कीच निर्माण होणार आहे

shyamrao yadav
शामराव बी. यादव

असे नवतरुण लोढा हेवन,पलावा शहरातील समाजसेवक, सक्षम भारतचे राष्ट्रीय समन्वयक आणि स्काय फाउंडेशनचे अध्यक्ष शामराव बी. यादव,  तुषार मोरे (अध्यक्ष शिक्षण आरोग्य मंच,डोंबिवली विभाग), प्रकाश चौगुले, मनोज यादव, हेमंत राठोड, मंगेश रुके, सागर काटे, अजय जाधव, विशाल कांबळे, सागर मोहिते यांच्या सहभागातून लोढा हेवन पलावा विभागातील नागरिकांसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव व कोरोना नंतर कशी काळजी घ्यावी किंवा नव्या आजाराबाबत उपाय योजना कोणती करावी आणि मदतकार्य यापुढे कसे अधिक जोमाने करावे अश्या प्रकारचा या तरुणांचा प्रयत्न असल्याने अजूनही परिसरातील युवकांनी या मिशन मदत कार्य कोव्हिडं १९ मध्ये सहभाग घ्यावा असेही परिसरातील तरुणांनी आवाहन केले आहे.तसेच

२५८३ व्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक २६/०५/२०२१ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत बालरोग तज्ञ डॉ मनोज ठमके (MBBS, MD, DCH,New Born and child Specialist) यांचे मार्गदर्शन झूम मिटिंग च्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.आताची कोव्हिडं १९ ची परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर जसे बोलले जाते की,लहान मुलांमध्ये आता कोरोनाची लाट येणार आहे…त्या विषयावर आपले प्रश्न उपस्थित किंवा विचारून आपणास डॉक्टर समाधान कारक उत्तरे देतील व आपल्या मुलांची कशी काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन करतील.Topic: Prevention is better than cure

झूम मिटिंग चे मुख्य आयोजक : शामराव बी यादव,तुषार मोरे,प्रकाश चौगुले,हेमंत राठोड,मनोज यादव,मंगेश रुके,विशाल कांबळे,सागर मोहिते,सागर काटे,नितीन सोनवणे,प्रवीण कदम, जी डी उपळेकर यांनी केले असून डोंबिवली,ठाणे,मुंबई,लोढा हेवन,पलावा इत्यादी शहरातील नागरिक झूम मिटिंग मध्ये सहभाग घेऊ शकतात.असे आवाहन करण्यात येत आहे. पालकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: