क्रीडा-अर्थमत

Zomato IPOला मिळू शकतो दमदार प्रतिसाद

मुंबई :
झोमॅटो लिमिटेडने ५५.२ कोटी शेअर्स, अँकर गुंतवणूकदारांना ७६ रुपये प्रति शेअरच्या वाटपातून ४,१९६ कोटी रुपये उभे केले आहेत. शेअर्स वाटप झालेल्या दिग्गज गुंतवणूकदारांपैकी अँकर बुकमध्ये समाविष्ट झालेल्यांमध्ये टायगर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंड, ब्लॅकरॉक ग्लोबल, फिडेलिटी फंड्स, जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट फंड आणि टी रोव प्राइस यांचा समावेश आहे. जागतिक गुंतवणूकदारांसोबत अँकरच्या गटात देशांतर्गत म्युच्युअल फंड्सचा जोरदार सहभाग दिसून आला. त्यांना एकूण ४१९६ कोटी रुपयांच्या अँकर बूकपैकी १,३९९ कोटी रुपयांचे १८.४ कोटी शेअर्स वाटप करण्यात आले.

 

एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे डीव्हीपी- इक्विटी स्ट्रॅटजिस्ट, ज्योती रॉय यांनी सांगितले की संस्थांचा अँकर बूकमधील दमदार सहभाग आयपीओसाठी चांगला आहे. रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून आयपीओला दमदार मागणी मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे. मजबूत डिलिव्हरी नेटवर्क, अडथळ्यांवर मात करत अपेक्षित बदल आणि टिअर २ व टिअर ३ शहरांमध्ये महत्त्वपूर्ण विकासाची संधी पाहता, झोमॅटो जागतिक स्पर्धकांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवेल, असे आमचे मत आहे. त्यामुळे आयपीओवर आम्ही ‘सबस्क्राइब’ ची शिफारस करत आहोत.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: