महाराष्ट्र

मान्यवर तज्ज्ञ करणार ‘कोरोना’ प्रश्नांचे समाधान

मुंबई :
देशभरात फोफावलेल्या ‘कोरोना’चा अटकाव अद्याप शक्य झाला नसला तरी, सध्या वाढत असलेल्या कोरोना वातावरणात अधिकाधिक सकारात्मक कसे राहता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हीच गरज ओळखून प्रसिद्ध समाजसेवक आणि ‘सक्षम भारत फाउंडेशन’ संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक शामराव यादव यांच्या पुढाकाराने ‘कोरोना काळात सकारात्मक समाज’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
झूम ऍपवर १३ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता सादर होणाऱ्या या ‘कोरोना काळात सकारात्मक समाज’ मार्गदर्शक कार्यक्रमात प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. धुरंधर कटके उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी  नागरी हिताच्या दृष्टीने कोरोनापासून बचाव व योग्य नियोजन करण्यासाठी काय केले पाहिजे? कोरोना झाल्यानंतर आणि होऊन गेल्यानंतर कशा पद्धतीने स्वतःची आणि इतरांची काळजी घेतली पाहिजे. या काळात मानसिक स्वास्थ कसे निरोगी राखले पाहिजे आदीबद्दल या कार्यक्रमात मार्गदर्शन होणार असून, उपस्थिताच्या प्रश्नांना समाधारक उत्तरे देखील देण्यात येतील असे शामराव यादव यांनी सांगितले आहे.
सदर कार्यक्रम नुकतेच निधन पावलेले समाजसेवक सखाराम उमाजी जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केला असून, ८ मे रोजी त्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम असणार आहे. यानिमित्ताने मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध नामवंत विचारवंत, कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी होणार असून नागरिकांनी यावेळी अवश्य ऑनलाईन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे सह प्रयोजक व कार्यक्रम संकल्पना तुषार मोरे व अनुष्य देवेकर असून, कार्यक्रमाची प्रस्तावना जी डी कदम उपळेकर हे करणार आहेत.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: