Gemini AI  देणार  ChatGPTला टक्कर?

गुगलने OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Bard लाँच केलं आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आलेल्या AI टूलने लोकांना ChatGPT इतकं आकर्षित केलं नाही. आता गुगलने आपलं नवीन प्रोडक्ट आणलं आहे. कंपनीने Gemini AI नावाचं पॉवरफुल आर्टिफिशियल इंटेलीजेन्स सिस्टम (AI) लाँच केली आहे.

जेमिनी हा गुगलचा एआय चा भविष्यातील प्लॅटफॉर्म आहे. बार्ड, गुगलच्या लॅग्वेंट मॉड्यूल PaLM 2 वर आधारित आहे. तर जेमिनी हे तंत्रज्ञानातील त्यापुढील पाऊल आहे. यामुळे युझर्सला एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. पुढील पिढीचे तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी जेमिनी मैदानात उतरणार आहे. हे तंत्रज्ञानाचे सुवर्ण युग असेल आणि आम्ही त्याची वाट पाहत असल्याचे, इनोव्हेशन क्षेत्रातील हे दमदार पाऊल असे सीईओ सुंदर पिचाई यांनी विश्वास व्यक्त केला.

Bard chatbot चा देखील यात समावेश करण्यात आला आहे, जो बार्ड युजर्सना अपग्रेड म्हणून मिळेल. Gemini या नवीन मॉडेलच्या मदतीने गुगलला OpenAI च्या GPT-4 आणि Meta च्या Llama 2 शी टक्कर द्यायची आहे. जेमिनी एआय अपडेट लवकरच जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाईल.

Gemini हे मल्टिमॉडल कॅपेबिलिटीसह येत आहे. युझर्सला एकाचवेळी, एकाच प्लॅटफॉर्मवरुन अनेक कामे करता येतील. म्हणजे टेक्स्ट, कोड आणि ईमेज जनरेट आणि रीड सर्व एकाच ठिकाणी होईल. ChatGPT केवळ टेक्स्ट मॉडेल आहे. त्याच्या मदतीने चित्र तयार करता येत नाही की छायाचित्र शेअर करता येत नाही.

Gemini AI खूप एडवान्स आहे आणि रिअल टाइममध्ये मल्टीटास्किंग करण्यास सक्षम असेल. हे एकाच वेळी टेक्स्ट, इमेज, कोड आणि व्हिडीओ अशा विविध प्रकारच्या माहितीवर काम करण्यास सक्षम असेल. याशिवाय रीजनिंग, कोडिंग आणि प्लॅनिंग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची क्षमता आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, हा एक अविश्वसनीय क्षण आहे आणि आम्ही फक्त जे शक्य आहे त्याचा पृष्ठभाग स्क्रॅच केला आहे (म्हणजेच, आम्ही शक्यतांच्या केवळ एका भागापर्यंत पोहोचू शकलो आहोत). गुगल डीपमाइंडचे वाइस प्रेसिडेंट ऑफ प्रोडक्ट एली कॉलिन्स यांनी एका ब्रीफिंग दरम्यान सांगितलं की, हे पहिलं एआय मॉडेल आहे, जे मानवी तज्ञांनी सेट केलेल्या बेंचमार्कच्या पुढे आलं आहे. 

Gemini AI युजर्स आणि त्यांच्या गरजेनुसार तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. पहिला अल्ट्रा असेल, हाय कॉम्प्लॅक्स टास्क कंप्लीट करण्यास सक्षम असेल. याशिवाय प्रो आणि नॅनो आहेत. सुरुवातीला ते इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल आणि 170 हून अधिक देशांमध्ये वापरता येईल. आगामी काळात इतर भाषांचा सपोर्ट जोडला जाईल.