वातावरणीय बदलाचा कोकणातील आंबा पिकाला फटका
कोकणातील विशेष फळ म्हणजे आंबा होय. चवीला गोड व रसाळ असणाऱ्या आंब्यावर सध्या बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे. कोकणात पडणाऱ्या अवकाळी पाऊस, दाट धुके आणि सततचे होणारे वातावरणीय बदल यामुळे आंब्याचा मोहोर काळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आंबा पिकावर किडांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.
सध्या कुठे झाडाला फुलोरा येण्याची व आंबे येण्याची प्रकिया सुरू होती. अशातच बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला झाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेल्या छोट्या कैऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सतत बदलत्या तावरणामुळे फळांचा राजा आंब्याला फटका बसला आहे. एकंदरीत या सर्व बाबींकडे पाहता कोकणातील आंबा व्यावसायिक संकटात सापडला आहे.