google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

आमदार मकरंद पाटीलांच्या पुतण्याच्या कंपनीची होणार सीबीआय चौकशी

सातारा (महेश पवार) :

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावान वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या पुतण्याच्या कंपनीच्या विरोधात बनावट धनादेश प्रकरणी हायकोर्टाने आज सी बी आय , तसेच राज्य सरकारला चौकशी चे आदेश दिल्याने वाई मतदार संघात खळबळ माजली आहे.

दरम्यान हे प्रकरण 92कोटीचे असले तरी यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही , या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास निश्चित पणे बडे मासे गळाला लागण्याची चर्चा सर्वसामान्यात होत आहे.

काय आहे नक्की प्रकरण थोडक्यात पाहूया…

पुण्यातील HDFC बॅंकेच्या बनावट धनादेश प्रकरणात उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, विरुद्ध तक्रार दाखल झाली होती .सदर कंपनीविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६७, ४७१ आर/डब्ल्यू अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.


उत्कर्ष कॉन्स्ट्रोवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही उत्कर्ष मिलिंद पाटील व अद्वैत मिलिंद यांचे नावे असुन संबंधित प्रकरण हे पुणे पोलीसांच्या कडून दडपण्याचा प्रयत्न झाला , मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करून तपास रखडला , आणि त्यामुळे या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एकाही व्यक्तीला अटकही झाली नाही. यामुळे सहा महिने उलटूनही आरोपपत्र दाखल झाले नाही तसेच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, गजानन प्रतापराव भोसले यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती‌, यात त्यांनी विद्यमान आमदारांच्या राजकीय दबावामुळे या गुन्ह्याचा तपास करण्यात राज्य सरकार ची यंत्रणा अपयशी ठरल्याने अशा गंभीर आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी विनंती केली होती.


या गंभीर स्वरूपाच्या वस्तुस्थिती आणि प्रथमदर्शनी आरोपांचा विचार करून, मुंबई उच्च न्यायालयाने ०२/०५/२०२२ रोजी नोटीस बजावली आणि सीबीआयसह राज्य सरकार ला याप्रकरणी उत्तर मागितले .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!