तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे… : शिवेद्रसिंहराजे
सातारा:
आरे तर्फ परळी सारख्या ग्रामीण भागात महेश पवार सारखा होतकरू युवक व्यवसायात पदार्पण करीत आहे . खरं तर तरुणांनी उद्योजक क्षेत्रात वळणं आजच्या परिस्थितीत गरजेचे आहे , यासाठी त्यांनी धाडस करणे महत्त्वाचे आहे . कष्ट, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पवार यांचे महालक्ष्मी फर्निचर अल्पावधीतच नाव कमवेल असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
तसेच त्यांना पुढील वाटचालीत लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी बोलताना सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा तालुक्यातील परळी भागातील आरे येथे महेश पवार यांनी नव्याने उभारलेल्या महालक्ष्मी फर्निचरच्या दालनाचा शुभारंभ सातारा जावली चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला, यावेळी राजू भैया भोसले यांसह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते.