2000 हजारांच्या नोटांबाबत मोठी अपडेट…
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून 2000 च्या नोटेबाबत एक मोठी अपडेट आली आहे. RBI ने बँकेत 2,000 ची नोट जमा करण्याची किंवा बदलण्याची तारीख वाढवण्याची घोषणा केली आहे. आता 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले की, बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याचा कालावधी संपला आहे. यासोबतच पुनरावलोकनाच्या आधारे बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत ते बँकेत जमा करु शकतात किंवा 7 ऑक्टोबरपर्यंत बदलून घेऊ शकतात.
दरम्यान, 19 मे 2023 रोजी आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा बदलून ठेवण्याची आणि जमा करण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने 30 सप्टेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली होती. एकावेळी फक्त 2000 रुपयांच्या 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील, असेही सांगितले. यानंतर, शनिवारी आरबीआयने अपडेट दिली की, आता 7 ऑक्टोबरपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा बदलून किंवा बँकांमध्ये जमा करता येतील.