google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीदेश/जग

नाताळ व नववर्ष साजरे करणासाठी भारतीयांची ‘या’ देशांना पसंती

मुंबई :
भारतीयांची नाताळ व नववर्ष साजरीकरणासाठी आशियाई देशांना पसंती असल्याचे कायक या जगातील आघाडीच्या ट्रॅव्हल सर्च इंजिनच्या अहवालातून निदर्शनास आले आहे. नाताळ व नववर्ष कालावधीसाठी (१९ डिसेंबर व ६ जानेवारी दरम्यान) प्रवासाकरिता कयकच्या नवीन सर्च इनसाइट्समधून निदर्शनास येते की, सीमेपलीकडे प्रवास करण्याला सुरूवात झाल्यापासून ते कमी होण्याची चिन्हे दिसून येत नसल्यामुळे पर्यटनाला उसळी मिळाली आहे.

आगामी नाताळ व नववर्ष कालावधीदरम्यान देशांतर्गत प्रवासासाठी रिअर्न इकॉनोमी फ्लाइट सर्चेस २०१९ मधील याच सर्च व ट्रॅव्हल कालावधीच्या तुलनेत जवळपास ३० टक्क्यांनी वाढले आहे, जेथे लांब पल्ल्यांसाठी आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट सर्च जवळपास ४९ टक्क्यांनी वाढले आहे, तर आशियासाठी शोधण्यात आलेल्या रिटर्न इकोनॉमी फ्लाइट्स सर्च जवळपास २० टक्क्यांनी वाढले आहे.

Christmas-in-India

कायक येथील भारताचे कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले, “भारतीय कुटुंब व मित्रांसोबत पुन्हा धमाल करण्यासाठी निर्बंध-मुक्त प्रवासाचा लाभ घेण्यास सज्ज असल्यामुळे कयकच्या डेटामधून यंदा नाताळ व नववर्ष साजरीकरणासाठी फ्लाइट सर्चमध्ये झालेली लक्षणीय वाढ निदर्शनास येते. दुबई, बँकॉक व बाली हे बारामाही आवडते गंतव्य आहेत, जेथे ते परदेशात प्रवासाच्या उत्‍साहासह तुलनेने कमी वेळेचे व जलद फ्लाइट्स देतात. गोवा आणि अंदमान व निकोबार बेटे देशांतर्गत लोकप्रिय गंतव्य आहेत, तसेच समुद्रकिनारे गंतव्यांप्रती लोकप्रियता देखील उच्च आहे.’’

तहिलियानी पुढे म्हणाले, “२९ व ३० डिसेंबर या देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी सर्वात किफायतशीर तारखा आहेत. सर्वोत्तम संभाव्य भाडे किंमत सुनिश्चित करू पाहणाऱ्या भारतीय प्रवाशांसाठी आम्ही तुमच्या निवडलेल्या गंतव्यस्थानासाठी दर सूचना सेट करण्याची शिफारस करतो, ज्‍यामुळे तुमच्या फ्लाइटची उत्तम किंमत सुनिश्चित करण्यात मदत होईल.’’

भारतीय पर्यटकांवर वाढलेल्या विमानप्रवास दरांचा काहीही परिणाम झालेला नाही, जेथे रिटर्न डॉमेस्टिक इकोनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत ₹१५,८४० आहे, ज्‍यामध्ये २०१९ च्या तुलनेत जवळपास ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे, आशियासाठी रिटर्न इकोनॉमी फ्लाइट किंमत जवळपास ३६,८३४ रुपये आहे, ज्‍यामध्ये जवळपास ५९ टक्के वाढ झाली आहे आणि रिटर्न इकोनॉमी लाँग हॉल फ्लाइट किंमत जवळपास ८०,००६ रुपये आहे, ज्यामध्ये जवळपास ५९ टक्के वाढ झाली आहे.

नाताळ व नववर्ष कालावधीदरम्यान प्रवासाकरिता भारतीय प्रवाशांसाठी रिटर्न इकॉनॉमी फ्लाइट्सच्या सर्वोच्च १० गंतव्य स्थानांमध्ये दुबई, गोवा, बँकॉक, बाली, अदमान व निकोबार बेट, माले, नवी दिल्ली, सिंगापूर, लंडन, हो ची मिन्ह सिटी या स्थानांचा समावेश आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!