google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजीलेख

आर्थिक फसवणूक विरोधात सुरक्षितता

– प्रभाकर तिवारी

तंत्रज्ञानामध्‍ये अनपेक्षित प्रगती झाल्‍यामुळे व्‍यापार व गुंतवणूक करणे कार्यक्षम आणि अत्‍याधुनिक बनले आहे. डिजिटलायझेशनमुळे अनेक गुंतवणूक संधी निर्माण झाल्‍या आहेत, तसेच ट्रेडिंग अॅपवर ऑनबोर्ड होणे आणि गुंतवणूकीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. पण यासोबत फसवणूक होण्‍याची शक्‍यता देखील वाढली आहे. फसवणूकीशी लढण्‍याचा सर्वोत्तम मार्ग म्‍हणजे अशा प्रकारच्‍या जोखीमांची माहिती देत वैयक्तिक गुंतवणूकदारांना सक्षम करणे. ब्रोकरेज क्षेत्रातील फिनटेक कंपन्‍या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, ज्‍यामधून गुंतवणूक प्रक्रिया अधिक सुरक्षित असण्‍याची आणि सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी होत असल्‍याची खात्री मिळते.

घोटाळेबाजांचा सामना करण्‍यासाठी गुंतवणूकदारांमध्‍ये जागरूकतेचा प्रसार:

फिनटेक कंपन्‍या सामान्‍य फसवणूका आणि नियामकांची भूमिका (जसे सेबी, आयआरडीए इत्‍यादी) याबाबत मुलभूत माहिती देण्‍यासाठी व्‍यापक उपक्रम राबवतात. ज्‍यामुळे कोणतीही फसवणूक आधीच ओळखता येते. लहान व्हिडिओ, ईमेलर्स, वेबिनार्स आणि सोशल मीडिया पोस्‍ट्स अशा आधुनिक साधनांच्‍या माध्‍यमातून गुंतवणूकदारांना बाजारपेठेतील प्रचलित घोटाळे व फसवणूक पद्धतींबाबत जागरूक केले जात आहे. एआय-आधारित चॅटबोट्सनी युजर परस्‍परसंवादामध्‍ये अधिक सुधारणा केली आहे, ज्‍यामुळे गुंतवणूकदारांना विशिष्‍ट अनपेक्षित संदेश किंवा ईमेल्‍सबाबत शंका असल्‍यास व्‍हॉट्सअॅप किंवा इतर कोणत्‍याही सक्षम मेसेजिंग अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून ते प्रतिनिधीशी सुलभपणे संवाद साधू शकतात.

तंत्रज्ञान-सक्षम साधने आहेत नवीन फ्रॉड बस्‍टर्स (फसवणूकीचा पर्दाफाश करणारे):

एआय व एमएल, तसेच ब्‍लॉकचेन अशा तंत्रज्ञानांमधील सुधारणांमुळे काही कंपन्‍यांना सिम्‍युलेशन्‍स, क्विझेस् व अपडेट्स अशी विविध साधने विकसित करण्‍यामध्‍ये फायदा झाला आहे. माहितीबाबत (संभाव्‍य फसवणूक व जोखीमांबाबत) गेमिफिकेशन हे प्रबळ साधन आहे. सिम्‍युलेशन्‍स गुंतवणूकदारांना फसवणूक करणाऱ्यांची पद्धत आणि फसवणूक पद्धती ओळखण्‍यामध्‍ये मदत करतात.

घोटाळा-मुक्‍त संपत्ती निर्मितीसाठी व्‍यापार सुरक्षित करणे:

सुधारित सुरक्षितता उपाय राबवत आणि नियमित ऑडिट्स करत सिस्‍टम पायाभूत सुविधेमध्‍ये सुधारणा करण्‍यासह ब्रोकरेज कंपन्‍यांनी घोटाळेबाज आणि फसवणूक करणाऱ्यांच्‍या एक पाऊल पुढे राहण्‍यासाठी प्रयत्‍न केला आहे. ट्रेडिंग व्‍यासपीठामध्‍ये प्रबळ सुरक्षितता उपाय असण्‍यासोबत ते अपडेट असण्‍याची खात्री घेतल्‍याने गुंतवणूकदारांचे अनेक फसवणूकींपासून संरक्षण होऊ शकते. तसेच वापरकर्त्‍यांना या सुरक्षितता वैशिष्‍ट्यांबाबत आणि त्‍यांचा प्रभावीपणे कसा वापर करावा याबाबत माहिती देणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

फसवणूक करणाऱ्यांचे समूळ निर्मूलन करण्‍यासाठी प्रबळ रिपोर्टिंग:

जोखीम व्‍यवस्‍थापन आणि फ्रॉड-डिटेक्‍शन सिस्‍टमची क्षमता प्रबळ रिपोर्टिंग यंत्रणेच्‍या माध्‍यमातून मोठ्या प्रमाणात सुधारता येऊ शकते. फिनटेक कंपन्‍यांनी फ्रॉड रिपोर्टिंगची (फसवणूक केल्‍याबाबत माहितीचा रिपोर्ट) प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुलभ केली आहे. ट्रेडिंग अॅपचा वापर करण्‍याव्‍यतिरिक्‍त सोशल मीडिया, व्‍हॉट्सअॅप आणि एआय-सक्षम सीआरएमच्‍या माध्‍यमातून कोणत्‍याही फसवणूक कृतींबाबत रिपोर्ट तयार करणे शक्‍य आहे. कोणतीही अनियमित किंवा संशयास्‍पद कृती ओळखणाऱ्या व वापरकर्त्‍यांना त्‍याबाबत चेतावणी देणाऱ्या अत्‍याधुनिक साधनांचा (जसे एमएल) अवलंब करत डेटा शेअरिंग व सहयोगाची प्रक्रिया सुधारता येऊ शकते आणि काही केसेसमध्‍ये स्‍वयंचलित देखील करता येऊ शकते.

काही ब्रोकरेज कंपन्‍यांनी व्‍यवहारांची पारदर्शकता व ट्रेसेबिलिटी सुधारण्‍यासाठी ब्‍लॉकचेन तंत्रज्ञानाचा देखील वापर केला आहे. ब्रोकरेज कंपन्‍यांनी अशा कोणत्‍याही फसवणूक प्रयत्‍नांना ओळखण्‍यासाठी व त्‍याबाबत रिपोर्ट देण्‍यासाठी नियामकांसोबत सहयोगाने अनुपालन प्रक्रिया सुधारत प्रतिसाद दिला आहे.

गुंतवणूकदारास अनुकूल ब्रोकिंग क्षेत्राची निर्मिती:

नियामक, ब्रोकिंग कंपन्‍या आणि इतर भागधारकांनी व्‍यक्‍तींना फसवणूकीबाबत रिपोर्ट करण्‍याकरिता माध्‍यम उपलब्‍ध करून देण्‍यासाठी सहयोग केला पाहिजे. तसेच एआय-आधारित फ्रॉड डिटेक्‍शन सिस्‍टम्‍स सारख्‍या प्रगत तंत्रज्ञान सोल्‍यूशन्‍सची अंमलबजावणी केल्‍यास फसवणूक करणाऱ्या कृती ओळखण्‍यास व त्‍यावर प्रतिबंध ठेवण्‍यास मदत होऊ शकते. सहयोगाने आपण फसवणूक पद्धतींना सहजपणे ओळखता व त्‍यावर प्रतिबंध ठेवता येईल असे भविष्‍य निर्माण करण्‍याप्रती काम करू शकतो, ज्‍यामधून सर्व गुंतवणूकदारांसाठी विश्‍वसनीय व सुरक्षित गुंतवणूक वातावरणाची खात्री मिळू शकते.

( लेखक एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर आहेत. )

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!