google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

विजय शेखर शर्मा यांनी दिला पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Vijay Shekhar Sharma Steps Down: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट बँकेत प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.

वास्तविक, पेटीएम पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर बोर्डात अनेक बदल करण्यात आले आहेत. पेटीएमने सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अर्धवेळ नॉन-एक्झीक्युटिव्ह अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी PPBL चे बोर्ड सदस्य पदही सोडले आहे.

दरम्यान, शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डाचीही पुनर्रचना करण्यात आली, ज्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर हे बोर्डाचे सदस्य असतील. याशिवाय, सेवानिवृत्त आयएएस देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि निवृत्त आयएएस रजनी सेखरी सिब्बल हे बोर्डाचे सदस्य असतील. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!