google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘मोव्हिन’चा या २८ शहरांत विस्तार

मुंबई :

यूपीएस आणि इंटरग्लोब एन्टरप्रायझेस यांच्या संयुक्त भागीदारीतून या वर्षीच्या मे महिन्या सुरु करण्यात आलेल्या आघाडीच्या मोव्हिन लॉजिस्टिक्स ब्रॅन्ड ने आता टिअर १ आणि टिअर २ बाजारपेठेतील २८ शहरात आपले अस्तित्व निर्माण केले असल्याची घोषणा केली. या संरचनात्मक वाढीचा एक भाग म्हणून मोव्हिन कडून आता देशभरांतील विविध ठिकाणी हब्स निर्माण करण्यात येत असून नुकताच महाराष्ट्रातील भिवंडी येथे नवीन हबची सुरुवात केली आहे.

मोव्हिन कडून वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाही पर्यंत स्थानिक पातळीवर आपली पोहोच वाढवण्यासाठी अशा आणखी १० हब्सची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे सेवांमध्ये वाढ होण्या बरोबरच बी२बी वाहतूक क्षेत्रातील सातत्याने वाढत्या मागण्या पूर्ण करण्याची क्षमताही वाढणार आहे.


कार्यातील या वाढी मुळे तंत्रज्ञानावर आधारीत नाविन्यांच्या सहाय्याने, बी२बी ग्राहकांना मोव्हिनच्या एक्सप्रेस एन्ड ऑफ डे आणि स्टॅन्डर्ड प्रिमियम डिलिव्हरी सेवा आता २ हजारांहून अधिक पिनकोड्स मध्ये उपलब्ध होणार आहेत. मोव्हिनच्या अनोख्या उत्पादनां मधील संपूर्ण अंदाज बांधण्यास योग्य, तसेच वेळेत मिळेल अशी सेवा संपूर्ण देशात प्राप्त होणार आहे. हवाई वाहतूक आणि रस्त्यांवरील त्यांच्या या नेटवर्क मुळे मालाची वाहतूक वेगाने होण्या बरोबरच सातत्यपूर्ण, अंदाज बांधण्यायोग्य आणि प्रतिसादात्मक कार्यक्षमता प्राप्त होते. मोव्हिन ची ही वाढ आता संपूर्ण भारतात हब्ज तयार करण्यात येणार असून त्यामुळे पिकअप आणि डिलिव्हरी साठीच्या पिन कोड्स मध्ये वाढ होणार आहे. विविध घटकांबरोबर भागीदारी करुन आणि कार्यावर आधारीत ग्राहक अनुभव केंद्रां मुळे सेवांच्या गुणवत्तेसह ग्राहकांना आता मुल्यावर आधारीत उपाय उपलब्ध झाले आहेत.


२००० हून अधिक पिन कोड्सना सेवा देण्या बरोबरच एक्सप्रेस एन्ड ऑफ डे नेटवर्क आता अहमदाबाद, अमृतसर, बडोदा, बंगळूरु, भोपाळ, भुवनेश्वर, चंदिगढ़, चेन्नई, कोचिन, कोईम्बत्तूर, दिल्ली-एनसीआर, गोवा, हैद्राबाद, इंदूर, जयपुर, जालंधर, कानपुर, कोलकाता, लखनौ, मंगलोर, मुंबई, पटणा, पुणे, रायपुर, रांची, सुरत, विजयवाडा आणि विशाखापट्टणम् या २८ शहरात सुरू करण्यात आली आहे.


मोव्हिनचे स्टॅन्डर्ड प्रिमियम नेटवर्क आता १३ शहरांत सुरु असून त्यांत अहमदाबाद, बंगळूरु, चंदिगढ, चेन्नई, कोचिन, कोईम्बत्तूर, दिल्ली-एनसीआर, हैद्राबाद, जयपुर, कानपुर, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे.


“या वर्षी मे मध्ये सुरू केल्यापासून मोव्हिन ने मोठी वाढ नोंदवली आहे, ही वाढ म्हणजे आमच्या भागीदारीवर आधारीत दृष्टिकोनानुसार असून भागीदारांची क्षमता ही तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षणा मुळे वाढू लागली आहे. आम्ही स्ट्रॅटेजिक हब्सला मेट्रो, टिअर १ आणि टिअर२ शहरांना जोडून आपली क्षमता वाढवत आहोत. आमच्या स्ट्रॅटेजिक हब्स मुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भागातील शहरांना स्टॅन्डर्ड प्रिमियम सेवांसाठी स्पर्धात्मक वेळ उपलब्ध करुन देऊ शकू. ग्राहकांचे समाधान ही गोष्ट आमच्यासाठी सर्वाधिक प्राधान्याची आहे, यासाठी आम्ही नेहमीच कार्यातील ऑटोमेशन आणि विश्वसनीयतेचा आधार घेत असतो. मोव्हिनने नुकतीच केलेली ही वाढ म्हणजे आमच्या कपडे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, ऑटोमोटिव्ह सूटे भाग, आरोग्य आणि ईकॉमर्स क्षेत्रातील आमच्या बी२बी ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर करण्यात आली आहे.” असे इंटरग्लोब एन्टरप्रायझेस चे संचालक आणि मोव्हिन एक्सप्रेस चे बोर्ड मेंबर जे बी सिंग यांनी सांगितले.


या वाढीतून असे अधोरेखित होते की मोव्हिनची भागीदारीची क्षमता तसेच अधिक विश्वसनीयता देण्याची क्षमता, ग्राहकांचा अनुभव आणि अधिक स्पर्धात्मकता यांमुळे व्यवसाय कशा प्रकारे जागतिक मुल्य शृंखलेत योग्य योगदान देऊ शकते. लवकरच भारतीय व्यवसाय व्हॅल्यू चेन सहीत जोडले जातील. “ आम्ही आमच्या ग्राहकांना विभागातील सर्वोत्कृष्ट अनुभव देण्यासाठी अधिक उच्च स्तरीय कार्यक्षमता, मजबूत वितरण वाहिन्या, अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि जागतिक पध्दतींचा अवलंब करत आहोत.” श्री सिंग पुढे म्हणाले.
मोव्हिन कडून लवकरच संपूर्ण भारतात सेवा सुरु करण्यात येणार असून एक्सप्रेस अर्ली मॉर्निंग (सकाळी १०.३० आधी) आणि एक्सप्रेस मिड डे (१२च्या आधी) सेवां मध्येही विस्तार करण्यात येणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!