
अॅक्सिस बँकेची boAt आणि मास्टरकार्डसोबत भागीदारी
भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने त्यांच्या नव्याने लाँच केलेल्या ‘वेव्ह फॉर्च्यून’ या अत्याधुनिक स्मार्टवॉचसाठी विना अडथळा टॅप अँड पे एनएफसी पेमेंट्स करण्यासाठी भारतातील नंबर वन वेअरेबल ब्रँड boAt आणि पेमेंटमध्ये जागतिक स्तरावर आघाडीच्या मास्टरकार्डशी सहयोग केल्याची घोषणा आज केली. ₹3,299 (विशेष ऑफर दरम्यान ₹2,599) अशी किंमत असलेले वेव्ह फॉर्च्यून ग्राहकांना सुविधा, सुरक्षा आणि स्मार्टवॉचचा नेक्स्ट लेव्हल अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहे.
आता बोटचे अधिकृत पेमेंट ऍप क्रेस्ट पे द्वारे अॅक्सिस बँक कार्डधारक वेव्ह फॉर्च्यून स्मार्टवॉचवर त्यांचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुरक्षितपणे टोकनाइज आणि स्टोअर करू शकतात आणि सहजतेने पेमेंट करू शकतात. मास्टरकार्डच्या टोकनायझेशन तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळालेली आणि TAPPY टेक्नॉलॉजीजच्या मजबूत टोकन रिक्वेस्टर इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे समर्थित हे वैशिष्ट्य, कार्ड पिन न टाकताही पीओएस डिव्हाइसवर ₹5,000 पर्यंतचे सिंगल-स्टेप पेमेंट करण्यास अनुमती देते, ज्यामुळे वेग आणि सुरक्षितता दोन्ही निश्चित होते.
मास्टरकार्डद्वारे समर्थित, ही पेमेंट सिस्टम ग्राहकांना जलद आणि अखंड व्यवहारांसाठी स्मार्टवॉच स्ट्रॅपमध्ये त्यांचे कार्ड सुरक्षितपणे टोकनाइज आणि स्टोअर करण्याची परवानगी देते. मास्टरकार्ड आणि व्हिसा नेटवर्कवरील अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना वेव्ह फॉर्च्यून स्मार्टवॉचने पेमेंट करताना त्यांच्या लिंक केलेल्या कार्डचे रिवॉर्ड आणि फायदे मिळत राहतील.
या भागीदारीबद्दल अॅक्सिस बँकेच्या कार्ड्स, पेमेंट्स आणि वेल्थ मॅनेजमेंटच्या प्रेसिडेंट & हेड, अर्निका दीक्षित म्हणाल्या, “ग्राहकांना नावीन्यपूर्ण आणि सुरक्षित डिजिटल बँकिंग सोल्यूशन्स देण्यासाठी नवोपक्रम भागीदारी मॉडेल्सवर आम्ही सातत्याने काम करत आहोत. याच प्रयत्नांतर्गत, लोकांच्या दैनंदिन जीवनात संपर्करहित पेमेंट्सचा समावेश करून, सहजगत्या पेमेंट करण्यासाठी boAt सोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. टोकनाइज्ड कॉन्टॅक्टलेस पेमेंट्सला आमचा टच देऊन, ‘वेव्ह फॉर्च्यून’ हे अत्याधुनिक स्मार्टवॉच ग्राहकांना जलद आणि सोयीस्कर पेमेंट अनुभवासह सुरक्षेच्या सर्वोच्च मानकांसह सुरक्षा देईल.”
boAt चे को-फाउंडर & सीईओ समीर मेहता म्हणाले, “आम्ही नेहमीच तंत्रज्ञानाचा अधिकाधिक फायदा घेत दैनंदिन गोष्टीत त्याचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतो. अॅक्सिस बँकेसोबतची आमची भागीदारी सुरक्षित, सहज पेमेंट्सना शब्दशः तुमच्या मनगटावर आणते, ज्यामुळे संपर्करहित व्यवहार आधीपेक्षा अधिक सोपे होतात.”
मास्टरकार्डचे डिव्हिजन प्रेसिडेंट, साउथ एशिया, गौतम अग्रवाल म्हणाले, “नजीकच्या भविष्यात, पेमेंट्स ही जेश्चरवर आधारित असतील – आणि त्याचा समावेश आपल्या दैनंदिन दिनचर्येत होईल. महत्त्वाचे म्हणजे व्यवहार विना कटकट होतील. कोणत्याही रूपात असो पण परिधान करण्यायोग्य उपकरणे ही या बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, जलद आणि सुरक्षित पेमेंट अनुभव देतील. भविष्याला आकार देण्यासाठी वचनबद्ध कंपनी म्हणून, मास्टरकार्ड टोकनायझेशन सक्षम स्मार्टवॉचला सक्षम करण्यासाठी उत्साही आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पैसे देण्यास सक्षम केले जाईल.”
परिशिष्ट:
उत्पादनाची अतिरिक्त वैशिष्ट्ये – वेव्ह फॉर्च्यून स्मार्टवॉच:
त्याच्या संपर्करहित पेमेंट कार्यक्षमतेव्यतिरिक्त, वेव्ह फॉर्च्यून स्मार्टवॉच वापरकर्त्यांना कनेक्टेड, स्टायलिश आणि प्रॉडक्टिव्ह ठेवण्यासाठी डिझाइन केले आहे – मग तुम्ही जिममध्ये असा, फिरत असा किंवा व्यावसायिक सेटिंग्जमध्ये असा. ते मनगटावर सुरक्षित असते, सहजरित्या येत – जाता पेमेंट करते आणि आपल्या लाईफस्टाईलला योग्य असे वेअरेबल्स तयार करण्यासाठी नावीन्यपूर्णतेसह सोयीचे मिश्रण करण्याच्या boAt चा दृष्टिकोन प्रतिबिंबित करते.
अ डिस्प्ले दॅट शाइन्स, फीचर्स दॅट डिलिव्हर:
- थेट सूर्यप्रकाशातही अपवादात्मक सुस्पष्टता 240×282 रिझोल्यूशनसह 96” एचडी डिस्प्ले आणि 550 निट्स ब्राइटनेस
- वेळ आणि सूचनांमध्ये सुलभतेसाठी वेक जेश्चर
- इमेज, थीम किंवा कलाकृतींसह तुमची होम स्क्रीन वैयक्तिकृत करण्यासाठी DIY वॉच फेस स्टुडिओ
फिटनेस आणि अंगभूत उपयुक्तता
- फिटनेस टप्पे गाठून boAt नाणी मिळवा – boAt ऑफरसाठी रिडीम करण्यायोग्य
- अल्ट्रा-क्लीअर ब्लूटूथ कॉलिंग, इंटरॅक्टिव्ह डायल पॅड, कॉन्टॅक्ट सेव्हिंग आणि क्रेस्ट पे चा थेट ऍक्सेस
वेव्ह फॉर्च्यून स्मार्टवॉच आता अॅक्टिव्ह ब्लॅक रंगात येथे उपलब्ध आहे [boAt website].