google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

‘बिर्ला ओपसचे ३ वर्षात ‘इतक्या’ हजार कोटींचे उद्दिष्ट’

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन, कुमार मंगलम बिर्ला यांनी “बिर्ला ओपस” या सजावटीच्या रंगांच्या नवीन ब्रँडअंतर्गत उत्पादने व सेवा सुरु करत असल्याची आज घोषणा केली. संपूर्ण क्षमतेनिशी संचालन करून पुढील ३ वर्षात १०,००० कोटी रुपयांचा एकूण रेव्हेन्यू कमावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. अशाप्रकारे आदित्य बिर्ला ग्रुपने १०,००० कोटी रुपयांच्या  वेगाने विस्तार पावत असलेल्या आणि तब्बल ८०,००० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेली भारतातील सजावटीच्या रंगांच्या बाजारपेठेत पदार्पण केले आहे, ज्यामध्ये या समूहातील प्रमुख कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड १०,००० कोटी रुपयांच्या अभूतपूर्व आगाऊ गुंतवणुकीसह बिर्ला ओपस हा व्यवसाय स्थापित करत आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचे चेयरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले, “आजचा भारत गतिशीलता, धाडस आणि क्रांतिकारी वृत्तीने भरलेला आहे. आमचा नवीन रंग उद्योग बिर्ला ओपस याच भारताचे प्रतिबिंब आहे. बांधकाम सामग्री इकोसिस्टिमबद्दल आदित्य बिर्ला ग्रुपला असलेली सखोल समज, गेल्या अनेक वर्षांचा अनुभव यामुळे आम्ही एका अनोख्या सुविधाजनक स्थानी आहोत. म्हणूनच बिर्ला ओपस रंग उद्योगक्षेत्राच्या सध्याच्या क्षमतेमध्ये ४०% वृद्धीसह या उद्योगामध्ये नवे परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. आज आम्ही कारखाने, संचालन, उत्पादने आणि सेवा हे सर्व एकाच वेळी जितक्या मोठ्या प्रमाणात सुरु करत आहोत, तितक्या मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवरील कोणत्याच रंग कंपनीने आजवर केलेले नाही.”  बिर्ला पुढे म्हणाले, “बिर्ला ओपसकडे आदित्य बिर्ला ग्रुपने सुरु केलेले एक मोठ्या प्रमाणावरील स्टार्ट-अप म्हणून पाहिले गेले पाहिजे. स्टार्ट-अपची चपळता, ऊर्जा आणि काटकसरी वृत्ती तसेच प्रतिष्ठित व गतिशील समूहाची ताकद, विश्वसनीयता आणि ब्रँड मजबुती यांचा अनोखा मिलाप बिर्ला ओपसमध्ये आहे.”

बिर्ला ओपसची उत्पादने मार्च २०२४ च्या मध्यापासून पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये आणि जुलै २०२४ पर्यंत भारतातील शहरांमधील १ लाख लोकसंख्येपर्यंत पोचतील. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ६००० पेक्षा जास्त शहरांमध्ये वितरणाचा वेगवान विस्तार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. रंगांच्या ब्रँडने संपूर्ण भारतभरात केलेली ही आजवरची सर्वात वेगवान आणि सर्वात व्यापक सुरुवात ठरणार आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचे संचालक हिमांशू कापानिया म्हणाले, “सर्जनशीलता, प्रमाण, पारदर्शकता, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांच्या मानकांची नवी व्याख्या रचण्यासाठी बिर्ला ओपस सज्ज आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, आम्ही कमी किमती आणि सर्वोत्तम गुणवत्तेतील सातत्य यांच्या साहाय्याने भविष्यवेधी तंत्रज्ञान व प्रवर्तक रसायनशास्त्र यांच्या मिलापाचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकू. रंगकामाचा आनंददायी व आधुनिक अनुभव मिळवून देऊन ग्राहकांची वाटचाल अधिक सहजसोपी केली जाईल हे बिर्ला ओपसचे वचन आहे.”

पाण्यासह वापरण्याचे रंग, इनॅमल रंग, वूड फिनिशेस, वॉटरप्रूफिंग आणि वॉलपेपर यांची १४५ पेक्षा जास्त उत्पादने आणि १२०० पेक्षा जास्त एसकेयू यांचा समावेश असलेली, या उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठी श्रेणी बिर्ला ओपस सादर करेल. इकॉनॉमी, प्रीमियम, लक्झरी, डिझायनर फिनिशेस आणि इन्स्टिट्यूशनल अशा विविध ग्राहकवर्गांमध्ये या उत्पादनांचा वापर केला जाईल. याबरोबरीनेच बिर्ला ओपस २३०० पेक्षा जास्त टिन्टेबल रंगांची सर्वात मोठी श्रेणी प्रस्तुत करेल, ज्यामध्ये २१६ भारतीय रंगांचा देखील समावेश असेल.

ग्राहकांना आनंद आणि समाधान प्रदान करण्यासाठी या ब्रँडने ‘पेंटक्राफ्ट’ या डायरेक्ट पेंटींग सेवा देखील पुरवण्याचे ठरवले आहे. अगदी सुरवातीपासूनच उत्पादने आणि सेवांची सर्वसमावेशक श्रेणी प्रस्तुत करणारा, वन-स्टॉप-शॉप ब्रँड या उद्योगक्षेत्रात प्रथमच येत आहे.

बिर्ला ओपसचे सीईओ रक्षित हरगवे यांनी सांगितले, “आमच्या मजबूत इन-हाऊस संशोधन व विकास क्षमता आणि विस्तृत क्षेत्र प्रमाणीकरणाच्या पार्श्वभूमीवर बिर्ला ओपस पाण्यावर आधारित उत्पादनांच्या इतर आघाडीच्या कंपन्यांच्या तुलनेत अधिक जास्त उत्पादन वॉरंटी देण्यासाठी वचनबद्ध आहे. इनॅमल आणि वूड फिनिश उत्पादनांवर वॉरंटी ही सुविधा पहिल्यांदाच देऊन बिर्ला ओपस एक मापदंड रचत आहे. ग्राहककेंद्री व्यवसाय या नात्याने बिर्ला ओपस लवकरच एक अनोखा आणि क्रांतिकारी कस्टमर अश्युरन्स प्रोग्राम सादर करणार आहे. शुभारंभानिमित्त ऑफरचा एक भाग म्हणून ग्राहकांना पाण्यावर आधारित उत्पादनांवर अतिरिक्त १०% व्हॉल्यूम मिळेल तर कंत्राटदारांना आमच्या बहुतांश उत्पादनांवर लॉयल्टी बेनिफिट्स मिळतील.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!