google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

Ola ने गूगल मॅप्सला ‘का’ केले ‘गुड बाय’?

ओला कंपनी गूगल मॅप्स आणि मायक्रोसॉफ्ट ‘ॲझ्युअर’मधून पूर्णपणे बाहेर पडली आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर)वर याबाबतची पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी, “आम्ही आता गूगल मॅप्समधून पूर्णपणे बाहेर पडलो आहोत. आम्ही Google Maps वर दरवर्षी १०० कोटी रुपये खर्च करायचो. पण आम्ही आमच्या इन-हाऊस ओला (Ola) मॅप्सवर पूर्णपणे शिफ्ट होऊन, या महिन्यात तो खर्च शून्यापर्यंत कमी केला आहे. तुमचे ओला ॲप तपासा आणि आवश्यक असल्यास अपडेट करा. तसेच, ओला मॅप्स API हे Krutrim क्लाउडवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्ट्रीट ह्युव, एनईआरएफ (NERF), घरातील फोटो, थ्रीडी नकाशे, ड्रोन नकाशे इत्यादीसारखी आणखी बरीच फीचर्स लवकरच येत आहेत”, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

तसेच कंपनीने ओला मॅप्स (Ola Maps) कसे तयार केले याबद्दल उत्सुक असलेल्यांच्या माहितीसाठी या आठवड्याच्या शेवटी एक ब्लॉग पोस्ट प्रकाशित करण्यात येणार आहे. हा ब्लॉग स्पष्ट करेल की, ओला मॅप्सचे कोणते भाग इन-हाउस बनविले गेले आणि कोणते भाग ओपन-सोर्स संसाधनांमधून आले आहेत. ओला मॅप्सच्या मागे असलेल्या तंत्रज्ञानाबद्दल अधिक जाणून घेण्याची ही तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक संधी आहे.

Ola चे Google Maps आणि Azure वरून त्यांच्या स्वतःच्या Ola Maps वर स्विच करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून, ओला केवळ मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत करत नाही, तर आपली ताकद दाखवत आहे. भाविश अग्रवाल यांनी १५ डिसेंबर रोजी भारतातील पहिले आर्टिफिशयल इंटेलिजन्स (AI) मॉडेल ‘क्रिस्टीम’ लाँच केले. कृत्रिम AI लाँच करण्याच्या निमित्ताने, कंपनीने क्लाउड सेवा आणि मॅपिंग सोल्युशन्ससाठी आपल्या योजनादेखील सादर केल्या आहेत. हे करतानाच आज कंपनीने गूगल मॅप्सला गुड बाय म्हणत ओला मॅप्सवर स्विच केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!