
गोवा
’19 डिसेंबर पर्यंत गोवा होणार 100 टक्के साक्षर’
गोवा वर्षाअखेरपर्यंत शंभर टक्के साक्षर राज्य होणार असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. राज्याची साक्षरता सध्या 98 टक्केपेक्षा जास्त असून, राज्य येत्या पाच महिन्यात संपूर्णपणे साक्षर होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत राज्यातील साक्षरतेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. तसेच, राज्यातील पंचायतीने त्यांच्या श्रेत्रातील निरक्षर लोकांची यादी शिक्षण खात्याकडे द्यावी, अशी विनंती देखील मुख्यमंत्री सावंत यांनी केली आहे.