google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘का’ झाली ‘आप’चे नेते अमित पालेकर यांना अटक?

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथे झालेल्या मर्सडीज अपघात प्रकरणात क्राईम ब्रँचने गुरूवारी आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांना अटक केली. या अपघातातील मर्सडीज परेश सावर्डेकर चालवत होता. त्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तिघांचा बळी घेतला होता. तथापि, त्याचा बचाव करण्यासाठी अमित पालेकर यांनी एका बनावट चालकाला तयार केले आणि त्याला म्हार्दोळ पोलिस स्थानकात नेले होते, असे तपासात आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

दोन ते तीन दिवसांपुर्वी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपमध्ये नाही आलो तर मला अटक करण्याची धमकी देण्यात आली होती. आणि आज मला अटक करण्यात आली आहे. हे निव्वळ डर्टी पॉलिटिक्स आहे.

या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नाही. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. अत्यंत गलिच्छ राजकारणाचा हा प्रकार आहे.

या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता तर तिघे जण जखमी झाले होते. एका पार्टीतून बाहेर पडल्यानंतर सावर्डेकर कुटूंबीय मर्सडीजमधून जात असताना हा अपघात झाला होता. त्या पार्टीचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यात अमित पालेकर देखील दिसून येत होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!