गोवा

काँग्रेसच्या विविध विभागप्रमुखांची नियुक्ती

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीने पक्षाच्या विविध विभाग आणि आघाडी संघटनांसाठी प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या असून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे.


नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. प्रमोद साळगावकर यांची महिला काँग्रेस, विजय भिके यांची सेवा दल, जनार्दन भंडारी यांची एनएसयूआय व युवक काँग्रेस, जेम्स आंद्राडे यांची प्रोटोकॉल, साविओ डिसोझा यांची तक्रार निवारण कक्ष, तर आल्तिन्हो गोम्स यांची निवडणूक आयोग विभागाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


हे पदाधिकारी संबंधित विभाग आणि आघाडी संघटनांशी समन्वय साधून पक्षाची तळागाळातील संघटनात्मक ताकद वाढविणे, अंतर्गत समन्वय सुधारणे आणि जनसंपर्क उपक्रमांना गती देण्याचे काम करतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!