
१४ रोजी होणार गोवा पोलिसांचा गौरव ‘स्वाभिमान २०२६’
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दर्या संगम, कला अकादमी येथे रंगणार भव्य सन्मान सोहळा
पणजी (प्रतिनिधी) : गोवा पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी राजेश्री क्रिएशन्सच्यावतीने माहिती व प्रसिद्धी संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वाभिमान २०२६ गोवा पोलीस पुरस्कार सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पणजी येथील कला अकादमीच्या दर्या संगम सभागृहात हा सोहळा रंगणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, माजी कला आणि सांस्कृतिक मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, आमदार केदार नाईक, कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर, गोवा पोलीस महासंचालक अलोक कुमार, एलआयसीच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक भावना कांकन, राजेश्री क्रिएशन्सचे संचालक प्रज्ञा नाईक आणि परेश नाईक यांच्यासह मान्यवरांची यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे.
गोवा पोलीस दलातील सुमारे ४० हून अधिक पोलिसांचा यावेळी सन्मान करण्यात येणार असून, यामध्ये दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पोलीस अधीक्षक नेर्लॉन अल्बुकर्क आणि उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांचा पोलीस अधीक्षक श्रेणीतील पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच पोलीस दलातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गुरुदास एन. गावडे यांना प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. ते पोलीस अधीक्षक (एल अँड व्ही), पणजी येथे कार्यरत आहेत. याशिवाय समाज आणि पोलीस दल यांच्यातील समन्वय, सामाजिक बांधिलकी आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत उपअधीक्षक तथा केपेचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश राणे आणि उपअधीक्षक तथा वास्कोचे उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुदास कदम यांना ‘समाजमित्र पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
राजेश्री क्रिएशन्सचे संचालक परेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला गोवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी संचालनालयाचे सहकार्य लाभले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून, गोवा पर्यटन, ट्युलिप डायग्नोस्टिक लिमिटेड, ग्रँड हयात, आणि कला अकादमी, गोवा हे कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजकआहेत.
या पुरस्कार सोहळ्यात गोवा पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेबरोबरच त्यांच्या कार्यामागे खंबीरपणे उभ्या असलेल्या कुटुंबीयांच्या योगदानाचीही दखल घेण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
या सोहळ्याला सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश असून, गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पोलीस दलाप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
संगीत, नृत्य आणि विनोदाची मेजवानी
‘स्वाभिमान २०२६’ हा केवळ पुरस्कार वितरण सोहळा नसून, मनोरंजनाचीही खास पर्वणी ठरणार आहे. प्रसिद्ध गायिका सोनिया शिरसाट यांच्या गायनाने कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. मराठी पार्श्वगायक रोहित राऊत आपल्या लोकप्रिय गीतांनी संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणार आहेत. ‘द कपिल शर्मा नाईट फेम’ किकू शारदा यांच्या विनोदी सादरीकरणातून हास्याची मेजवानी अनुभवता येईल. पुण्यातील एंजल्स डान्स अकादमीच्या नृत्यदिग्दर्शनाखाली विशेष नृत्याविष्कार सादर होणार असून, गोमंतकीय अभिनेता वर्धन कामत यांचे सादरीकरणही कार्यक्रमात रंगत आणणार आहे.
जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत असतात. अनेकदा आपल्या कर्तव्यापोटी त्यांना वैयक्तिक आयुष्य, कुटुंब आणि अनेक सुखसोयींचा त्याग करावा लागतो. पोलीस दलाच्या या कार्याचा गौरव करणे, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करणे आणि पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे, हा ‘स्वाभिमान २०२६’ उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
– गोविंद गावडे,
आमदार तथा अध्यक्ष स्वाभिमान पुरस्कार.
‘स्वाभिमान २०२६’ पुरस्कारार्थींची सविस्तर यादी
१. पोलीस अधीक्षक
– नेर्लॉन अल्बुकर्क – पोलीस अधीक्षक, दहशतवादविरोधी पथक (एटीएस), पणजी.
– हरीश मडकईकर – पोलीस अधीक्षक, उत्तर गोवा.
२. लोकमान्य पुरस्कार
– गुरुदास एन. गावडे – पोलीस अधीक्षक, एल अँड व्ही, पणजी.
३. समाजमित्र पुरस्कार
– निलेश राणे – उपअधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, केपे.
– गुरुदास कदम – पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, वास्को.
४. मुख्य लिपिक (Head Clerk)
– शिवानंद साळगावकर – मुख्य लिपिक, प्रशासकीय शाखा, पोलीस महासंचालक कार्यालय, पणजी.
५. पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police)
– सुदेश नार्वेकर – पोलीस उपअधीक्षक, वाहतूक विभाग (उत्तर), पणजी.
– रुपेंद्र शेटगावकर – पोलीस उपअधीक्षक, विशेष शाखा, पणजी.
– सुदेश वेळीप – पोलीस उपअधीक्षक, मुख्यालय (उत्तर), पर्वरी.
– ब्रुटानो पॅक्सिटो – पोलीस उपअधीक्षक, दहशतवादविरोधी पथक (एटीएस), पणजी.
६. पोलीस निरीक्षक (Police Inspector)
– शैलेश नार्वेकर – पोलीस निरीक्षक, विशेष शाखा केंद्र, वास्को.
– विजय चोडणकर – पोलीस निरीक्षक, पणजी पोलीस स्थानक.
– मोहन गावडे – पोलीस निरीक्षक, फोंडा पोलीस स्थानक.
– लक्षी आमोणकर – पोलीस निरीक्षक, कळंगुट पोलीस स्थानक.
– मीरा जोस सेबॅस्टिआओ डिसिल्वा – महिला पोलीस निरीक्षक, महिला पोलीस स्थानक.
– दत्तगुरू सावंत – पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.
७. पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector)
– सर्वेश आर. सावंत – पोलीस उपनिरीक्षक, सायबर गुन्हे पोलीस स्थानक.
– अमीर तरल – पोलीस उपनिरीक्षक, हणजूण पोलीस स्थानक.
– सिताराम मलिक – पोलीस उपनिरीक्षक, पर्वरी पोलीस स्थानक.
– तीर्था शेटकर – महिला पोलीस उपनिरीक्षक, म्हापसा पोलीस स्थानक.
– श्रीधर संजीव कामत – पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग / दक्षता विभाग.
८. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector)
– अशोक रामचंद्र गावडे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा.
– निलेश फोगुरी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, डिचोली पोलीस स्थानक.
– विनोद एम. नाईक – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पर्वरी पोलीस स्थानक.
– प्रज्ञा पी. नाईक – महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, कुडचडे पोलीस स्थानक.
– संतोष टी. शिरसोडकर – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, कुळे पोलीस स्थानक.
९. पोलीस हवालदार (Head Constable)
– सजोत सावंत – पोलीस हवालदार, क्रमांक ५१४६, विशेष शाखा, फोंडा.
– नंदकुमार एस. गोसावी – पोलीस हवालदार, क्रमांक ५३१७, काणकोण पोलीस स्थानक.
– प्रेमनाथ व्ही. सावळ देसाई – पोलीस हवालदार, क्रमांक ५९९०, वाहतूक विभाग, पेडणे.
– श्रद्धा एस. नाईक – महिला पोलीस हवालदार, क्रमांक ५२३९, वास्को पोलीस स्थानक.
– नवनाथ एम. गावस – पोलीस हवालदार, क्रमांक ४९०२, वाळपई पोलीस स्थानक.
– हेमंत एल. काणकोणकर – पोलीस हवालदार, क्रमांक ६२२९.
१०. पोलीस शिपाई (Police Constable)
– उदेश एस. देसाई – पोलीस शिपाई, क्रमांक ६१२३, सांगे पोलीस स्थानक.
– निकेत एच. नाईक – पोलीस शिपाई, क्रमांक ६८८९, मोपा पोलीस स्थानक.
– सुदेश सावंत – पोलीस शिपाई, क्रमांक ६०५२, जुने गोवे पोलीस स्थानक.
– रीना राजेश गावकर – महिला पोलीस शिपाई, क्रमांक ६७८६, फातोर्डा पोलीस स्थानक.
– रोहन आय. सिओळकर – पोलीस शिपाई, क्रमांक ८१३९, मांद्रे पोलीस स्थानक.
११. सरकारी अभियोक्ता (Public Prosecutor)
– देवानंद कोरगावकर.
– राल्स्टन बॅरेटो.
१२. होमगार्ड
– तादेओ फ्रान्सिस डायस.
– योगिता विश्वनाथ गावस.


