google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

खरे लढवय्ये पळून जात नाहीत; विरियातो यांचा दिगंबरांना टोला 

मी देशाच्या सैन्यदलात सेवा बजावली आहे. मी नौदलात होतो आणि कारगिल युद्धात माझा सहभाग होता. खरे लढवय्ये भ्याडांसारखे पळून जात नाहीत, असा जबरदस्त टोला  काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी हाणला आहे.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आपण लढाऊ असल्याचा व शेवटपर्यंत रणांगण सोडून जात नसल्याच्या केलेल्या वक्तव्यावर ते प्रतिक्रिया देत होते. दिगंबर कामत 2022 मध्ये मडगावच्या आसपास असलेल्या नावेली, कुडतरी, बाणावली मतदासंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यात का अपयशी ठरले असा सवाल कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला आहे.

2022 मध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व दिगंबर कामत करत होते. त्यांनी आम्हाला काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याची देवासमोर शपथ दिली आणि शेवटी त्यांनी स्वत:च देवाचा विश्वासघात केला आणि पळून गेले, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले.

दिगंबर कामत यांचे “यस सर” नगरसेवक दामोदर शिरोडकर यांचा नगराध्यक्ष म्हणून विजय सुनिश्चित करण्यासाठी त्यांना नगरपालिका कायद्यात सुधारणा करावी लागली. सदर नगरसेवकाचा नगराध्यक्षपदाच्या पहिल्याच प्रयत्नात लाजिरवाणा पराभव झाला होता याची आठवण कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी करुन दिली.

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार देखील गोमंतकीयांचा विश्वासघात करणाऱ्या आणि   मंदिर,होली क्रॉस आणि दर्ग्यासमोर आम्हां उमेदवारांना शपथ देणाऱ्या व नंतर खुद्द देवांनाही फसवून आपल्या स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या दिगंबर कामतांवर विश्वास ठेवणार नाही हे स्पष्ट आहे, असे कॅप्टन विरियातो फर्नांडिस म्हणाले.

मडगावात काँग्रेसच्या बाजूने मतदान होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. मडगावचे नागरिक हे देवभक्त आहेत आणि कायम रंग बदलणाऱ्या सरड्यांप्रमाणे ते रंग बदलणार नाहीत. मडगावच्या मतदारांच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने मडगावात बहुतांश बूथवर आघाडी मिळवण्याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे कॅप्टन विरियातो म्हणाले.

दिगंबर कामत यांनी आपल्या स्वार्थापोटी मडगावच्या नागरिकांना वेठीस धरले हे अत्यंत खेदजनक आहे. मडगावच्या दुरवस्थेला दिगंबर कामतच जबाबदार आहे. मडगावच्या जनतेला मी नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!