सिनेनामा 

IFFI 2026 : ‘इंडियन पॅनोरमा’मध्ये ‘या’ २५ फिचर फिल्म्स, २० लघुपटांची झाली निवड

‘बेस्ट डेब्यू डायरेक्टर’ पुरस्कारासाठी पाच चित्रपट नामांकित; पाच वेब सीरिजही पुरस्काराच्या शर्यतीत

पणजी : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) महत्त्वपूर्ण विभाग असलेल्या ‘इंडियन पॅनोरमा’मध्ये यंदा २५ फिचर फिल्म्स आणि २० नॉन-फिचर फिल्म्स प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागातील पाच चित्रपटांचाही समावेश आहे. ‘इंडियन पॅनोरमा २०२६’च्या उद्घाटनाचा मान आदित्य धर दिग्दर्शित हिंदी चित्रपट ‘धुरंधर’ याला मिळाला आहे. तर लीना यादव दिग्दर्शित लडाखी भाषेतील ‘बिकमिंग’ हा नॉन-फिचर चित्रपट उद्घाटनासाठी निवडण्यात आला आहे.

 

फिचर फिल्म विभागासाठी प्राप्त झालेल्या ४०४ चित्रपटांमधून २५ चित्रपटांची, तर नॉन-फिचर विभागासाठी आलेल्या ३५८ चित्रपटांमधून २० चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध भाषा, विषय आणि कलात्मक अभिव्यक्तींचे दर्शन या निवडीच्या माध्यमातून घडणार आहे.

चित्रपट कलेला प्रोत्साहन देणे आणि सिनेमॅटिक, आशयात्मक तसेच सौंदर्यात्मकदृष्ट्या उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणे, हा इंडियन पॅनोरमाचा मुख्य उद्देश आहे. फिचर आणि नॉन-फिचर चित्रपटांच्या निवडीसाठी स्वतंत्र ज्युरी नियुक्त करण्यात आल्या होत्या. या दोन्ही ज्युरींचे नेतृत्व स्वतंत्र अध्यक्षांनी केले.

भारतीय चित्रपटसृष्टीतील नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे, नव्या दृष्टिकोनांना आणि नावीन्यपूर्ण अभिव्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा ‘बेस्ट डेब्यू डायरेक्टर ऑफ इंडियन फीचर फिल्म’ पुरस्काराचा उद्देश आहे.

इंडियन पॅनोरमासाठी २५ चित्रपटांची निवड

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय ज्युरीने फिचर फिल्म विभागातील चित्रपटांची निवड केली. यामध्ये इंडियन पॅनोरमा फिचर फिल्म विभागातील २० आणि मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागातील पाच चित्रपटांचा समावेश आहे.

निवड झालेले चित्रपट :

१. पारो – द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी (हिंदी) – गजेंद्र अहिरे
२. लालो – कृष्ण सदा सहायते (गुजराती) – अंकित भूपतभाई साखिया
३. द केरळ स्टोरी २ गोज बियॉन्ड (हिंदी) – कामाख्या नारायण सिंह
४. कृष्णावतारम (हिंदी) – हार्दिक गज्जर
५. बर्ड्स ऑन आइस (लडाखी) – साहिल शाह
६. स्क्रोल (तमिळ) – कन्नन एस.
७. पागला घोडा (बंगाली) – शेखर दास
८. आदि अनंत (मराठी) – महेश लिमये (शिवकुमार लिमये)
९. उरुम (न्यीशी) – दुयू ताब्यो
१०. बनारस (हिंदी) – भारतबाला गणपती
११. कबीर सर का आखिरी लेसन (हिंदी) – सरफराज
१२. सिंग गीतम (तेलुगू) – सिंगितम श्रीनिवास राव
१३. ओह माय डॉग (हिंदी) – अमित राय
१४. रुबी-क्यूब (कन्नड) – पी. शेषाद्री
१५. सेव मिच्छर (हिंदी) – मुस्कान अस्थाना
१६. पिली चन्ने (तुळू) – अनुपमा शराधी
१७. द ग्रेट ग्रँड सुपरहिरो एलियन्स का आगमन (हिंदी) – मनीष सैनी
१८. थाई किझवी (तमिळ) – शिवकुमार मुरुगेसन
१९. सूर्यजामुखी (आसामी) – अंतरा जी. जी. चौधरी
२०. सर्वं माया (मल्याळम) – अखिल सत्यन

मुख्य प्रवाहातील पाच चित्रपट

 

१. कांतारा : अ लेजेंड चॅप्टर १ (कन्नड) – ऋषभ शेट्टी
२. बाप्या (मराठी) – समीर तेवारी
३. मन शंकर वरप्रसाद गारू (पंडगा की वस्तुन्नारू) (तेलुगू) – अनिल रविपुडी
४. धुरंधर (हिंदी) – आदित्य धर
५. देऊळ बंद २ (मराठी) – प्रवीण विठ्ठल तरडे

पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी पाच चित्रपट नामांकित

 

१. चेन्नई लव्ह स्टोरी (तेलुगू) – रवी वर्मा नंबुरी
२. प्रत्यावर्तन (बंगाली) – समर्पण सेनगुप्ता
३. तिघी (मराठी) – जिजीविषा काळे
४. स्लेज (काश्मिरी) – राजा शबीर मोहम्मद खान
५. हनुमान अंश (हिंदी) – डॉ. विशाल चतुर्वेदी

नॉन-फिचर विभागात २० चित्रपट

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ हिमांशू शेखर खटुआ यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय ज्युरीने नॉन-फिचर चित्रपटांची निवड केली. या विभागासाठी आलेल्या ३५८ चित्रपटांमधून २० चित्रपट निवडण्यात आले आहेत.

 

१. द अनसीन होली रिव्हर – सरस्वती (हिंदी) – भास्कर विश्वनाथन
२. बिकमिंग (लडाखी) – लीना यादव
३. शत्-शत् अटल (हिंदी) – अतुल पांडे
४. द हग ऑफ एम्प्टीनेस (कन्नड) – प्रदीप कुमार शेट्टी के.
५. रेड कार्पेट (आसामी) – ऐमी बरुआ
६. डेमोग्राफी इज डेस्टिनी (हिंदी) – कामाख्या नारायण सिंह आणि अंशुमन शेखर
७. इकोज ऑफ द लास्ट शेल्टर (हिंदी) – भारत अरोरा आणि राजेश भाटिया
८. विन (तेलुगू) – प्रवीण
९. उलिदिद्दु संपिगे मात्र (कन्नड) – अभिषेक
१०. निर्माणजली : द चंदीगड ऑफ मॅचिएज नोविकी (इंग्रजी) – सूरज कुमार
११. शिक्षा (मराठी) – अमित पाटकर
१२. नक्श-ए-दौर (काश्मिरी) – बाबा तसद्दुक हुसेन
१३. चांदोबा (मराठी) – निपुण धर्माधिकारी
१४. आभाळ-वृक्ष (मराठी) – संतोष डावखर
१५. अट्टापडी (तमिळ) – विजीश मणी
१६. सेव्ह द गॉड (हिंदी) – नीरज कुमार मिश्रा
१७. अमित अटल (हिंदी) – हितेश शंकर
१८. स्विच ऑफ (मल्याळम) – संदीप फ्रान्सिस
१९. चलो इंडियन विथ एरिक जी – मिझोरम (इंग्रजी) – राजदीप चौधरी
२०. कथार कथा (बंगाली) – धृतिश्री सरकार

१९७८ मध्ये इफ्फीच्या अंतर्गत सुरू झालेला ‘इंडियन पॅनोरमा’ हा विभाग भारतीय चित्रपट आणि देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला चित्रपट कलेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. वर्षभरातील उत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, हा त्यामागील प्रमुख हेतू आहे.

इफ्फीमधील प्रदर्शनाव्यतिरिक्त या विभागासाठी निवडलेले चित्रपट भारतातील आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये, द्विपक्षीय सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत आयोजित भारतीय चित्रपट महोत्सवांमध्ये तसेच देशांतर्गत विशेष ‘इंडियन पॅनोरमा’ महोत्सवांमध्येही प्रदर्शित केले जाऊ शकतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!