google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आराजाने निधन झालं आहे. त्या 81 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांना अल्जायमर होता.

2020 मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देवने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली होती. तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रमेश देव यांचं निधन झालं होतं. हृदयविकाराच्या झटक्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. सीमा देव यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

राजा परांजपे दिग्दर्शित ‘जगाच्या पाठीवर’ (1961) या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. ‘सुवासिनी’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.

रमेश देव आणि सीम देव यांनी मराठी चित्रपटांपेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. केवळ अभिनयानेच नाही तर आपल्या प्रेमकहाणीनेही त्यांनी चाहत्यांच्या मनात स्थान मिळवलं. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या चित्रपटात रमेश देव यांनीदेखील भूमिका साकारली होती. या पहिल्याच चित्रपटापासून ही जोडी सुपरहिट ठरली होती. त्यानंतर दोघांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडली. सीमा देव यांनी ‘सरस्वतीचंद्र’, ‘ड्रीम गर्ल’, ‘आनंद’, ‘कोशिश’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

1962 मध्ये ‘वरदक्षिणा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सीमा आणि रमेश देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुलं आहेत. त्यापैकी अजिंक्यनेही आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तर अभिनय हा दिग्दर्शन आणि पटकथा लेखन क्षेत्रात कार्यरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!