RRR मधील ‘नाटू नाटू’ गाण्याला oscar
एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
या विभागात ‘RRR’मधील ‘नाटू नाटू’सोबतच ‘टेल इट लाइक अ वुमन’मधील ‘अप्लाऊज’, ‘टॉप गन : मॅवरिक’मधील ‘होल्ड माय हँड’, ‘ब्लॅक पँथर : वकांडा फॉरेव्हर’मधील ‘लिफ्ट मी अप’ आणि ‘एवरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स’मधील ‘दिस इज अ लाइफ’ या गाण्यांना नामांकनं मिळाली होती.
याआधी नाटू नाटू गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता. भारतीय सिनेसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. ‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगीत दिग्दर्शक एम एम कीरवानी , गीतकार चंद्रबोस आणि ‘नाटु नाटु’ या ‘गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट स्वतंत्र गीत’ या विभागातील ऑस्कर पुरस्कार मिळवल्याबद्दल ‘आर आर आर’ चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
‘आर आर आर’ चित्रपटातील ‘नाटु नाटु’ हे गाणे जगभरात लोकप्रिय झाले असून त्याचे हे यश उल्लेखनीय असल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हटले आहे.