google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

यश साकारणार मोठ्या पडद्यावर ‘रामायण’

रॉकिंग स्टार यशचे मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स आणि नमित मल्होत्रा यांचा प्राइम फोकस स्टुडिओ वैश्विक महाकाव्य ‘रामायण’ मोठ्या पडद्यावर साकारण्याच्या निर्मितीत सहभागी झाले आहेत. ‘आजवर सांगितली गेलेली सर्वात मोठी कथा’ जगभरातील प्रेक्षकांकरता साकारण्यासाठी सिनेनिर्मितीतील सामर्थ्यवान अशा दोन दिग्गज कंपन्या सहयोग करीत आहेत.


मनोरंजन उद्योगात खळबळ माजवणारा एक महत्त्वपूर्ण सहयोग घोषित झाला असून, याअंतर्गत नमित मल्होत्रा यांची प्रॉडक्शन कंपनी ‘प्राइम फोकस स्टुडिओ’ आणि रॉकिंग स्टार यश यांची ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स’ जगभरातील प्रेक्षकांसाठी ‘रामायण’ या भारतातील अजरामर गाथेची निश्चित आवृत्ती तयार करण्याच्या प्रयत्नांत सहभागी झाले आहेत.


दूरदर्शी निर्माता नमित मल्होत्रा हे एकाहून अधिक अकादमी पुरस्कार विजेती व्हिज्युअल इफेक्ट कंपनी ‘डीएनइजी’ वैश्विक मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत. अनेक वर्षांपासून ही पुराणकथा मोठ्या पडद्यावर साकारण्याची त्यांची योजना विकसित करत आहेत. जागतिक सुपरस्टार यशसोबत त्याच्या या महत्त्वाकांक्षेबाबत चर्चा करताना, नमितला दोघांमध्ये याबाबत एक समान स्वारस्य असल्याचे दिसून आले आणि दोन चित्रपट निर्मिती करणाऱ्या शक्तिशाली कंपन्यांनी भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जगासमोर आणण्याकरता एक सामायिक स्वप्न साकार करण्याचे निश्चित केले.


प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी आणि ‘डीएनइजी’ सोबत, आजवर पाहिला गेला नसेल असा दृष्यात्मक सिनेमॅटिक अनुभव देण्याकरता, नमित आणि यश यांनी भारतीय पौराणिक कथा आणि कथाकथन परंपरेबाबत असलेले कालातीत आकर्षण जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित करण्यासाठी एक महत्त्वाचा प्रवास सुरू केला आहे.


पात्र आणि कथा यांच्यामध्ये प्राण फुंकण्यात त्यांच्या असलेल्या निर्विवाद क्षमतेमुळे, यश हा जागतिक आयकॉन गणला जातो, ज्याने भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक उत्कट चाहतावर्ग प्राप्त केला आहे. २०१४ पासूनच्या त्याच्या सर्व चित्रपटांचा एक सृजनशील निर्माता म्हणून यशपाशी नावीन्यपूर्णतेचा आणि अनुभवांचा खजिना आहे. तो ज्या प्रकल्पात सामील असतो, तो प्रत्येक प्रकल्प सखोलपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, हे निश्चित.


या नव्या संकल्पाविषयी यश म्हणाला,  “जागतिक स्तरावर बघितला जाईल, असा भारतीय चित्रपट बनवण्याची माझी बऱ्याच वर्षांपासूनची इच्छा आहे. त्याचा पाठपुरावा करताना, मी एका सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स स्टुडिओशी सहयोग करण्याकरता लॉस एंजेलिसमध्ये होतो आणि माझ्याकरता आश्चर्याची गोष्ट अशी की, त्यामागील प्रेरक शक्ती एका भारतीयाची होती.


नमित आणि माझी कल्पनांची देवाणघेवाण करणाऱ्या अनेक बैठका झाल्या आणि योगायोगाने, भारतीय सिनेमाच्या दृष्टिकोनातून आमचा समन्वय उत्तम प्रकारे जुळला. आम्ही विविध प्रकल्पांवर विचारमंथन केले आणि या चर्चेदरम्यान रामायणाचा विषय पुढे आला. या कामामध्ये नमितचा सहभाग होता; रामायण एक विषय म्हणून, माझ्यात खोलवर रूजलेला आहे आणि त्याविषयी माझ्या मनात एक दृष्टिकोनही होता. रामायणाची सह-निर्मिती करण्यात सहभागी होऊन आम्ही एका भारतीय चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी आमची सामूहिक दृष्टी आणि अनुभव एकत्र आणत आहोत, जो जगभरातील प्रेक्षकांमध्ये उत्साह आणि उत्कटता निर्माण करेल.”


एकत्रितपणे, हे दोघे निर्माते सर्जनशील, तांत्रिकदृष्ट्या निपुण आणि अनुभवी अशा परिपूर्ण मिलाफाचे प्रतीक आहेत, ज्यामुळे चाहते या महत्वाकांक्षी आणि रोमांचक निर्मितीसाठी उत्सुक आहेत. नमित मल्होत्रा व यश यांच्या नेतृत्वाखाली आणि नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनातून साकारणारा ‘रामायण’ हा एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव बनत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!