google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘इथे’ झाले ‘किसी का भाई किसी की जान’ मधील पहिले गाणे रिलीज

Salman Khan: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ मधील ‘नैयो लगदा’या पहिल्या गाण्याचा टीझर समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये या गाण्याबद्दलची उत्सुकता वाढत आहे. अशातच, दर्शकांची उत्सुकता वाढत असतानाच, बिग बॉस 16 च्या ग्रँड फिनालेमध्ये ‘नैयो लगदा’हे गाणे अखेरीस रिलीज करण्यात आले आहे. ‘नैयो लगदा’हे गाणे हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केले असून याचे लिरिक्स शब्बीर अहमद आणि कमाल खान यांनी लिहिले आहेत. तसेच, पलक मुच्छल यांनी हे गाणे गायले आहे.


सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

http://bit.ly/NaiyoLagda

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!