google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवासिनेनामा 

‘गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यावर सरकारने लक्ष द्यावे’

मडगाव :

“ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट” या चित्रपटासाठी दिग्दर्शकाचे सहाय्यक आणि द्वितीय युनिट सिनेमॅटोग्राफर म्हणून कान्स चित्रपट महोत्सवात रेड कार्पेटवर सहभागी होण्याचा मान मिळवीलेल्यी अभिमानी गोव्याचे सुयश कामत यांचे अभिनंदन, कान्स चित्रपट महोत्सवात 30 वर्षात भारतीय चित्रपटाचा मुख्य स्पर्धा विभागात समावेश होणे हि अभिमानास्पद बाब आहे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.


एफटीआयचे माजी विद्यार्थी असलेले गोव्याचे अक्षय पर्वतकर यांचेही मी अभिनंदन करतो, ज्यांनी वॉकर्स अँड कंपनीच्या फेलोशिपचा भाग म्हणून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला. फिल्म कम्पॅनियनच्या सहकार्याने त्यांच्या  “द वॉकर्स प्रोजेक्ट” साठी माझ्या  शुभेच्छा, असे युरी आलेमाव म्हणाले.


गोव्यासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे की आमचे प्रतिभावान युवक कान्स फिल्म फेस्टिव्हलसारख्या प्रतिष्ठित महोत्सवात सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवत आहेत. दुर्देवाने गेल्या अकरा वर्षांत गोवा सरकार स्थानिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यात अपयशी ठरले आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.


काँग्रेस सरकारने स्थानिक चित्रपट निर्मात्यांसाठी गोवा चित्रपट वित्त योजना सुरू केली होती आणि गोव्यातील अनेक चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत विभागात प्रदर्शित करण्याची संधी दिली होती. दुर्दैवाने भाजप सरकारने ही योजना गेल्या अकरा वर्षांत गुंडाळून ठेवली, असे युरी आलेमाव म्हणाले.


सरकारने आता कालबाह्य संकल्पना असलेल्या “फिल्म सिटी” प्रकल्पावर जनतेचा निधी खर्च करण्यापेक्षा स्थानिक चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला पाहिजे. तंत्रज्ञान बदलले आहे आणि आता संगणकावर गोष्टी करता येतात. सरकारचे लक्ष फिल्म मेकिंगमधील फिल्म स्कूल्स आणि प्रशिक्षणावर असले पाहिजे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.


मी अशी मागणी करतो की गोवा मनोरंजन संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणाऱ्या तरुण प्रतिभावान तरुणांसाठी पुरस्कार जाहीर केले पाहिजेत. ईएसजीने अशा सर्व चित्रपट निर्मात्यांच्या आणि चित्रपट उद्योगाशी संबंधित इतरांच्या कामगिरीची दखल घेणारी  एक योजना तयार करण्याची गरज आहे, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली.


आगामी विधानसभा अधिवेशनात स्थानिक चित्रपट निर्मात्यांना सरकारी मदतीचा मुद्दा मी पुन्हा एकदा उपस्थित करणार आहे. स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे आणि बिगर गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांवर सरकार उढळपट्टी करीत आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!