‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ची ऑस्करमध्ये अधिकृत एंट्री
९५ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२३ च्या नामांकनांची घोषणा आज करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्कर चित्रपटांवर चर्चा सुरु होत्या. ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ हे गाणं आता बेस्ट ओरिजनल सॉंग या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झालं आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटाची एंट्री ऑस्करमध्ये झाली आहे. ‘नाटू नाटू च्या बरोबरीने ‘होल्ड माय हॅन्ड’, ‘लिफ्ट मी अप’, ‘applause’ ही गाणी शर्यतीत आहेत.
This year's Original Song nominees are music to our ears. #Oscars #Oscars95 pic.twitter.com/peKQmFD9Uh
— The Academy (@TheAcademy) January 24, 2023
राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ओरिजनल साँगचा अवॉर्ड जिंकला होता. जगभरातील दिग्गज कलाकार मंडळीसुद्धा या चित्रपटाच्या प्रेमात पडली आहेत. हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनीदेखील राजामौली यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले.
‘आरआरआर’ चित्रपटाने संपूर्ण जगावर गारुड केलं आहे. जपानमध्ये तर या चित्रपटाने रजनीकांत यांच्या चित्रपटाचा रेकॉर्डही मोडीत काढला आहे. जागतिक पातळीवर या चित्रपटाने १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाला गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे आता चाहत्यांना पुरस्करांची उत्सुकता लागली आहे.
या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.