‘सहित स्टुडिओ’च्या नव्या कोंकणी लघुपटाचे चित्रिकरण सुरू…
मडगाव:
लघुपटाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करण्याची मोठी परंपरा आहे, अशावेळी ‘घर’ या आपल्या आगामी लघुपटामध्ये सहित स्टुडिओने अशाच एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाला अत्यंत कलात्मकदृष्टीने हात घातला आहे. कोंकणी सिनेमांत असे वैविध्यपूर्ण प्रयोग आजवर झाले आहेत, हिच परंपरा सहित कायम राखेल, असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक आणि कोंकणीचे लढवय्ये नेते उदय भेंब्रे यांनी व्यक्त केला. किशोर अर्जुन लिखित आणि दिग्दर्शित ‘घर’ या कोंकणी लघुपटाचा मुहूर्त मडगाव येथे केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक आणि रवींद्र केळेकार विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत अग्नी, गोवा मनोरंजन सोसायटीचे माजी सदस्य विशाल पै काकोडे, हाय फ्लाय ट्रॅव्हल्सचे जितेंद्र प्रभूदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहित स्टुडिओच्यावतीने निर्माण होत असलेल्या या पाचव्या कोंकणी लघुपटाचे चित्रिकरण प्रामुख्याने दक्षिण गोव्यात सुरू झाले. झीरो माईल्सस्टोन फिल्म्स, सृजन थिएटर्स आणि विकास प्रोडक्शन या लघुपटाचे सादरकर्ते आहेत. या लघुपटाची कथा संकल्पना माधुरी अशीरगडे यांची असून, कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन किशोर अर्जुन यांचे आहे. तर रवींद्र यांचे छायाचित्रण आहे.

या लघुपटात बहुभाषिक अभिनेत्री रावी, गौरी कामत, अभिनेता रोहित खांडेकर, बाल कलाकार शार्दुल यांच्या प्रमुख भूमिका असून, विकास कासलीवाल, समृद्धी पानसे, गंधाली सतिश, सुनंदा काळुसकर, सई म्हांबरे, डॉ. अपूर्वा पैदारकर, अभय जोशी, दिग्विजय वास्कर, मार्क फर्नांडिस आदी सहाय्यक भूमिकेत आहेत. किशोर अर्जुन आणि रश्मी नर्से यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे.
गेल्या काही वर्षात कोंकणीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर उत्तमोत्तम लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती सहित स्टुडिओ करत आहेत. लघुपट, माहितीपट, सिनेमा आणि साहित्य यांच्या माध्यमातून कोंकणी भाषा सर्वदूर नेण्यासाठी ‘सहित’ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. आणि त्यांच्या या प्रयत्नांना आजवर उत्तम प्रतिसाद लाभला आहे, तसाच प्रतिसाद याही लघुपटाला मिळावा, अशा सदिच्छा अनंत अग्नी यांनी दिल्या. तर गोव्यातील लघुपट आणि सिनेमांना राज्य सरकारने योग्य ते सहकार्य देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे स्थानिक सिनेमांना उर्जितावस्था मिळण्यासाठी सरकारच्या सिनेअनुदान योजनेमध्ये सुसूत्रता आणणे आणि स्थानिक कलाकारांना सर्वतोपरी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे विशाल पै काकोडे यांनी यावेळी नमूद केले. जितेंद्र प्रभूदेसाई यांनीदेखील ‘घर’च्या सगळ्या टीमला शुभेच्छा दिल्या.